• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे संस्थापक डेव्हिड राज यांना श्रध्दांजली

ByMirror

Nov 30, 2022

सर्वसामान्यांचे न्याय, हक्क जपण्याचे काम करणारा संघर्षशील नेता हरपला -संदीप कापडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ अहमदनगर शाखेच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. डेव्हिड राज यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

स्व. डेव्हिड राज

यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप (नाना) कापडे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे, कार्याध्यक्ष शरद महापुरे, अनिल गायकवाड, विकास दंडवते, संतोष वाघ, सविता हराळ, स्वाती दातीर, गोरक्षनाथ सांगळे, नितीन देवकर, विलास मकासरे, अशोक टाके, कैलास जगताप, राम कवाणे, उत्तम गरगडे, वंदना शिंदे आदी उपस्थित होते.


डेव्हिड राज यांचे मंगळवारी (दि.29 नोव्हेंबर) पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे न्याय, हक्क जपण्याचे काम केले जात आहे. या संघटनेचे 27 देशात कार्य सुरु असून, मागील तीस वर्षापासून डेव्हिड राज राष्ट्रीय पातळीवर सर्वसामान्यांच्या न्याय, हक्कासाठी कार्य करत होते. त्यांच्या निधनाने संघर्षशील नेता हरपला असल्याचे जिल्हाध्यक्ष संदीप (नाना) कापडे यांनी सांगितले.


राज्य कार्याध्यक्ष रविराज साबळे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व डेव्हिड राज यांच्या रुपाने गमावले असून, त्यांची उणीव भरून निघणार नसल्याचे सांगून शोक व्यक्त केला.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *