• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

अनाथ बालकांनी लुटला बाल नाट्याचा आनंद

ByMirror

Jun 5, 2023

युवानने पाचशे निराधार बालकांसाठी उपलब्ध केली संधी

अहमदनगर (प्रतिनिधी)- अनाथ, निराधार व गरजू विद्यार्थ्यांना आधार देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करणार्‍या युवान या सामाजिक संस्थेमार्फत विविध अनाथाश्रमांतील तब्बल 500 वंचित बालकांना प्रसिद्ध अभिनेते लेखक दिलीप प्रभावळकर लिखित बोक्या सातबंडे या बालनाट्याचे विशेष प्रयोग दाखविण्यात आला. माऊली सभागृहात रंगलेल्या या नाटकात बालके रममाण झाली होती.


अनाथांशी मैत्री या उपक्रमांतर्गत युवान मार्फत वंचितांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून एका दर्जेदार व्यावसायिक नाटकाची पर्वणी वंचित बालकांना देण्यात आली. नगरचा नवोदित बालकलाकार आरुष प्रसाद बेडेकर याने या नाटकात बोक्या सातबंडे ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारली आहे. तब्बल 2 तासांच्या नाटकातील प्रत्येक प्रसंगाला बाल रसिकांची मिळालेली उत्स्फूर्त दाद नाटकाची रंगत वाढविण्यास कारणीभूत ठरली.


ऐरवी सामान्य घरातील मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत घराबाहेर मनसोक्त बागडायला मिळते. परंतू विविध वसतीगृहांतील वंचितांना चार भिंतीतच सुट्टी घालवावी लागत होती. त्यांची मानसिक भूक भागविण्यासाठी युवानने केलेल्या प्रयत्नांबद्दल प्रयोगासाठी उपस्थित अनेक मान्यवरांनी युवानचे कौतुक केले. यावेळी धनश्री सुजय विखे पाटील, गौरव फिरोदिया, कल्याणी फिरोदिया, आशिष पोखरणा, मोहनलाल मानधना, जागृती ओबेरॉय, गीता माळवदे, नकुल चंदे, प्रतिभा धूत, गायक पवन नाईक, अमित बठेजा आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सर्वांनी सहकुटूंब या उपक्रमास हजेरी लावली होती. तसेच वंचित बालकांचे आनंदी पालकत्व स्विकारले


नाटकाच्या सरतेशेवटी सर्वांनी नाटकाच्या पाश्‍वगीतावर ठेका धरला. झाडे, प्राणी यांच्याशी घट्ट मैत्री करण्याची तसेच प्लॉस्टिक प्रदुषणाचा धोका कमी करण्यासाठी यापुढे स्वतःपासून सुरवात करण्याची सर्वांनी प्रतिज्ञा केली. युवानचे संस्थापक संदिप कुसळकर यांनी वंचितांचे आनंदी पालकत्व स्विकारलेल्या उपस्थितांचे आभार मानले. उपक्रम यशस्वितेसाठी सचिव सुरेश मैड, संजय दळवी, रुपेश झंवर, डॉ. अशोक कराळे, जीवन म्हस्के, दशरथ देवरे, सुयोग अनाप, ऋषीकेश अनाप, मारुती वाघमोडे, सुनिल फुलमाळी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *