• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

आषाढी एकादशीनिमित्त जन्मलेल्या मुलीचे स्वागत

ByMirror

Jul 18, 2024
आषाढी एकादशीनिमित्त जन्मलेल्या मुलीचे स्वागत

डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त जन्मलेल्या मुलीचे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर चिंताजनक असताना संस्थेच्या माध्यमातून स्त्री जन्माच्या स्वागताचे उपक्रम सुरु असून, या उपक्रमातंर्गत शहरात नुकतेच कन्यारत्न झालेल्या कोमल अतुल जाधव या मातेचा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी सत्कार केला.


नवजात मुलीला कपडे देऊन व मातेचा सन्मान करुन स्त्री जन्माचे स्वागत करण्यात आले. यावेळी बाबूराव जाधव, सुनिता जाधव, चंद्रकला जाधव, उज्वला निमसे, भाऊसाहेब जाधव, दत्तात्रय डुकरे, मंदाकिनी डुकरे, सुवर्णा वाघ आदी उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, समाजात स्त्री जन्माचे स्वागत होणे गरजेचे आहे. मुलींचा कमी होत चाललेला जन्मदर चिंताजनक असून, यासंदर्भात जागृती होणे आवश्‍यक आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला अव्वल ठरत असताना मुलगा-मुलगी यांना एक समान वागणुक दिली गेली पाहिजे. स्त्री जन्माच्या स्वागतासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *