• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

साथीचे आजार रोखण्यासाठी थेट ग्रामपंचायत सदस्यानेच केली औषध फवारणी

ByMirror

Jul 12, 2024
साथीचे आजार रोखण्यासाठी थेट ग्रामपंचायत सदस्यानेच केली औषध फवारणी

परिसर स्वच्छ ठेऊन पाण्याचे डबके साचू न देण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- पावसाळ्यात होणारे साथीचे आजार टाळण्यासाठी निमगाव वाघाचे (ता. नगर) ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी थेट पाठीवर औषधाचे पंम्प घेऊन औषधाची फवारणी केली.


सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात मोठ्या प्रमाणात गवत वाढून व लहान-मोठे पाण्याच्या डबक्यात डासांची उत्पत्ती होत आहे. संभाव्य साथीच्या आजाराचे धोके टाळण्यासाठी डोंगरे यांनी पुढाकार घेऊन जिल्हा परिषद शाळा परिसर, मारुती मंदिर व मस्जिद परिसरात औषधाची फवारणी केली.


दरवर्षी पावसाळ्याच्या प्रारंभी गावात साथीचे आजार पसरत असतात. यामुळे लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. यावर्षी साथीच्या आजाराचे धोके टाळण्यासाठी डोंगरे यांनी हा उपक्रम राबविला. गावात चिकनगुन्या, डेंग्यू आदी साथीचे आजारांचा अटकाव करण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून औषध फवारणीची मोहिम हाती घेण्यात आली आहे. घाण व साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे डेंग्यूसह इतर साथीचे आजार पसरत असल्याने ग्रामस्थांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, पाण्याचे डबके साचू देऊ नये व घरात अधिक काळ पाणी साचवून न ठेवता गरजेनुसार औषध फवारणी करण्याचे डोंगरे यांनी आवाहन केले. या उपक्रमासाठी ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, सरपंच लता फलके, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी भुजबळ, वर्षा औटी, शांता नरवडे, किरण सांगळे, विजय शिंदे, राणी पाटोळे, नवनाथ फलके यांचे सहकार्य लाभत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *