• Mon. Sep 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगरमध्ये शालेय रायफल शूटिंगचा थरार

ByMirror

Sep 28, 2026
पदक विजेत्या नेमबाजांचा गौरव

खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग; अचूक नेमबाजीने खेळाडूंनी गाजवला मैदान


पदक विजेत्या नेमबाजांचा गौरव


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर महानगरपालिका आणि अहिल्यानगर शूटिंग स्पोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय मनपा रायफल शूटिंग स्पर्धा 2026-27 उत्साहात पार पडली. भिंगार येथील इन्फिनिटी स्पोर्ट शूटिंग क्लब येथे झालेल्या या स्पर्धेत अहिल्यानगर शहरातील तब्बल 74 शालेय खेळाडूंनी सहभाग नोंदवत आपल्या नेमबाजी कौशल्याचे दर्शन घडविले.
स्पर्धेचे उद्घाटन नगर शहराचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते झाले. विविध गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी अचूक नेम साधत उत्कृष्ट कामगिरी केली. पदक विजेत्या खेळाडूंचा गौरव अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्या हस्ते मेडल व ट्रॉफी देऊन करण्यात आला.


स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून पदके मिळविणाऱ्या खेळाडूंचा मेडल व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सी.ए. ज्ञानेश्‍वर उर्फ राजेंद्र काळे, माजी नगरसेविका मनीषा काळे, प्रवीण धायतडक (सेल्फ केअर फाउंडेशन), लेफ्टनंट कर्नल ध्रुव नासीर, उद्योजक हरीश नय्यर, प्रियदर्शनी पब्लिक स्कूलच्या प्राचार्य अंजली बोधक, बाळासाहेब खोमणे, संजय साठे आणि घनश्‍याम सानप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वरिष्ठ कक्ष अधिकारी लाड, सोल मॅडम, आमदार संग्राम जगताप, खासदार नीलेश लंके, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, क्रीडा अधिकारी प्रियंका खिंडारे, संतोष वाबळे, कोमल वाकळे, व्हिन्सेंट फिलिप्स तसेच सर्व पालकांनी शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अलीम शेख, ऋषिकेश दरंदले आणि सागर फाटके यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.
–—


शालेय जिल्हास्तरीय मनपा रायफल शूटिंग स्पर्धा 2026-27 मधील विजेते पुढीलप्रमाणे:-
एअर पीप साइड रायफल प्रकारात मुलांच्या 14 वर्षे वयोगटात पृथ्वीराज देशमुख व आयुष राऊत, 17 वर्षे वयोगटात चैतन्य गंधडे, साईराज बागुल व पार्थ वाणी, तर 19 वर्षे वयोगटात शिवेद्र नेमणे व आयुष कोहोक यांनी पदक मिळवले.
मुलींच्या 14 वर्षे वयोगटात कार्तिकी कोकाटे व श्रुती बडेकर, 17 वर्षे वयोगटात पंकजा आटोळे, मुग्धा राजापूरे व मानसी वाबळे, तर 19 वर्षे वयोगटात किर्ती चक्रवर्ती, राजनंदिनी काळे व राजलक्ष्मी घडेकर यांनी पदक पटकावले.


एअर पिस्तूल प्रकारातील मुलांच्या 14 वर्षे वयोगटात आयुष इंगळे व शिवाश धामणे, 17 वर्षे वयोगटात अद्वय धायतडक, युवराज ठाणगे व प्रेम वाणी, तर 19 वर्षे वयोगटात तन्मय वाघ, आदित्य बुचुडे व समर कुसमुडे यांनी पदक मिळवले.
मुलींच्या 14 वर्षे वयोगटात ज्ञानेश्री बागल, 17 वर्षे वयोगटात वेणुश्री मंगलारप व नक्षत्रा धामणे, तर 19 वर्षे वयोगटात श्रावणी भगत, सिद्धी खुरंगे व अनुष्का जाधव यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.


ओपन साइड एअर रायफल प्रकारात मुलांच्या 14 वर्षे वयोगटात शंभूराज कोरेकर, आयुष शिंदे व श्‍लोक दळवी, 17 वर्षे वयोगटात वरुण कोल्हे, श्रवण राऊत व प्रथमेश गदादे, तर 19 वर्षे वयोगटात ओमकार मांडे, अभिज्ञान काळे व वेदांत होळकर यांनी पदके मिळवली. मुलींच्या गटात 14 वर्षे वयोगटात गायत्री शिर्के, तर 17 वर्षे वयोगटात आदिती अलचेट्टी हिने पदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *