• Sun. Jul 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त निमगावात रंगणार सातवे काव्य संमेलन

ByMirror

Nov 13, 2024

काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अनिताताई काळे यांची निवड

नगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर सातव्या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 12 जानेवारी रोजी होणाऱ्या या काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका तथा मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिताताई काळे यांची निवड करण्यात आली आहे.


अनिताताई काळे यांचे शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात योगदान असून, त्या कवियत्री म्हणून देखील त्यांच्या काव्य संग्रह प्रकाशित झालेले आहेत. साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांची काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती काव्य संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.


काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी काळे यांची निवड झाल्याबद्दल संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, कवियत्री सरोज आल्हाट, कवी गिताराम नरवडे, गझलकार रज्जाक शेख, माजी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, कवी आनंदा साळवे, मा. प्रा. शंकरराव चव्हाण, प्राचार्या गुंफाताई कोकाटे, मिराबक्ष शेख, ज्ञानदेव पांडुळे, हेमलता गिते, सिमा गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे. काव्य संमेलन यशस्वी होण्यासाठी युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे-खोडदे, सचिन जाधव, गौतम फलके, अक्षय ठाणगे, ऋषीकेश बोडखे, छाया वाबळे, कांता वाबळे, किरण ठाणगे, देविदास आंबेकर, प्रियंका डोंगरे-ठाणगे परिश्रम घेत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *