• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात 12 जानेवारी रोजी रंगणार चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

ByMirror

Dec 2, 2025
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उपक्रम

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उपक्रम


विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार सन्मान; पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती व राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त 12 जानेवारी रोजी चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, धार्मिक, साहित्य, वैद्यकिय व पर्यावरण संवर्धनावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व सामाजिक संस्थांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून, पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे व युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे यांनी केले आहे.


दरवर्षी प्रमाणे संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा सप्ताह विविध उपक्रमांनी निमगाव वाघा (ता. जि. नगर) येथे उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव पुरस्कार, समाज गौरव, क्रीडा रत्न व युवा गौरव, राष्ट्रमाता जिजाऊ नारी शक्ती पुरस्कार तसेच साहित्य क्षेत्रात काव्य प्रतिभा पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. या पुरस्कारांसाठी 20 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवायचे आहे. प्रस्ताव पाठविण्यासाठी संस्थेचे कार्यालय स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था (अध्यक्ष, पै.नाना डोफ्लगरे), निमगाव वाघा ता. जि. अहिल्यानगर 414005 या पत्त्यावर पाठवावे व अधिक माहितीसाठी 9226735346; 8605775261 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *