देव | देश | धर्म संकल्पनेतून भक्ती आणि फ्युजन संगीताचा अनोख्या संकल्पनेतून झाले भक्तीगीतांचे सादरीकरण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अनाहत एक कलासृष्टी आयोजित ‘द भक्ती बीट्स ‘भजन जॅमिंग अँड फ्युजन महावीर ग्रुप यांच्या विशेष सहकार्यातून, तसेच विचार भारती आणि समर्थ सत्संग परिवार यांच्या विशेष सहयोगातून या सांगीतिक सोहळ्याचे आयोजन माऊली सभागृह येथे करण्यात करण्यात आले होते.पारंपरिक भारतीय वाद्ये व पाश्चात्य वाद्ये यांचा सुंदर मिलाफ,भक्तिसंगीताचा आध्यात्मिक गंध, भक्तिरसाने ओथंबलेले शब्द आणि आधुनिक संगीताचा दमदार ठेका यांचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी अहिल्यानगरकरांना मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात ‘आई गिरी नंदिनी’ या देवीच्या भक्तिगीताने झाली. देवीला नमन करून सुरू झालेल्या या मैफलीत पुढे ‘हनुमान चालीसा’च्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. ‘मंगल भवन अमंगल हारी’ या भगवान श्रीरामांच्या गीताने सभागृहात ‘जय श्रीराम’चा जयघोष घुमला. ‘राम नाम जप’ या गीतालाही रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.‘वो कान्हा तेरी बासुरी’ या गीतातून भगवान श्रीकृष्णाच्या बासरीचा सुरेल भावविश्व प्रेक्षकांसमोर उभे राहिले. ‘ब्रज रस’, ‘अरे द्वारपालो’, ‘रामा रामा रटते रटते’ आणि ‘अवध में राम आए हैं’ या गीतांनी रामभक्तीचा उत्कट आविष्कार घडविला. या सादरीकरणांदरम्यान अनेक रसिक मंत्रमुग्ध झाले, तर भक्तिगीतांच्या तालावर सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.‘ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने’ आणि ‘नमो नमो जी शंकरा’ या गीतांच्या सादरीकरणातून भगवान शंकराला संगीतमय वंदन करण्यात आले. त्यानंतर ‘कीजो केसरी के लाल’, ‘श्रीराम जानकी’, ‘बघ उघडुनी दार’ आणि ‘हरी म्हणा तुम्ही’ या गीतांनी कार्यक्रमात अधिक रंगत आणली.
समर्थभक्त मंदारबुवा रामदासी,आमदार संग्राम जगताप, उपमहापौर धनंजय जाधव,महावीर ग्रुपच्या विजयाताई भंडारी,चंदूकाका सराफचे गणेश निकम, साईदीप हिरोचे सुधीर चोपडा,नगरसेविका पुष्पाताई बोरुडे,विचार भारतीचे राजाभाऊ मुळे, सुधीर लांडगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, ऍडलॅबचे अविनाश शिरापुरी,अनाहतचे प्रसाद सुवर्णपाठकी, प्रसाद बेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी समर्थभक्त मंदारबुवा रामदासी म्हणाले की, अनाहत एक कलासृष्टीने समाजात भक्तीचे विचार रुजविण्यासाठी मोठे धाडस दाखवत हा अभिनव कार्यक्रम आयोजित केला आहे. अशा सात्त्विक आणि संस्कारक्षम कार्यक्रमांना समाजातून पाठबळ मिळणे आवश्यक आहे. शरीरात देव, दानव आणि मानव या तिन्ही प्रवृत्ती असतात. मानवाकडून देवत्वाकडे जाण्याचा प्रवास या भक्तिसोहळ्यातून अनुभवता येतो. अनाहत नादाचा उंबरठा ओलांडून संगीताच्या माध्यमातून ईश्वराची अनुभूती घेता येते, असे त्यांनी सांगितले. या भक्तिमय उपक्रमाच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात उमेशराज साळुंके, गणेश बैरागी, सौरभ साठे, गौरी रत्नपारखी, महेशराज साळुंके, ज्ञानेश्वर पाठक, विधान बैरागी, भावेश राणे, किर्तेश बाविस्कर, सागर वाघमारे, धनंजय गोहेर, अनिकेत साळुंके आणि यश फुलारे या गायक व वादकांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. प्रत्येक कलाकाराने आपल्या सादरीकरणातून भक्तिगीतांना वेगळी उंची दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी विविध दाखले, प्रसंग आणि भक्तिसंगीताशी संबंधित विचार मांडत प्रभावीपणे केले.
भक्तिसंगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि समृद्ध परंपरेचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. पारंपरिक भजनांमधील भक्तिभाव, भावस्पर्शी शब्द आणि आध्यात्मिक ऊर्जा यांना आधुनिक संगीतशैलीची जोड देत नव्या पिढीला भारतीय भक्तिसंगीताशी जोडण्याचा अनोखा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.
ओंकार देऊळगावकर, ॲड. आनंद कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, श्रेया सुवर्णपाठकी, अमृता बेडेकर, वैष्णवी कुलकर्णी,सोहम सौंदणकर, विनोद गरुड, बंटी ढोरे,अनुजा कुलकर्णी,गायत्री धनलगडे, गीतांजली सगम, अमित डोंगरे, जान्हवी देऊळगावकर,अनिकेत गोसावी, मोहिनी खोल्लम, सर्वेश खोल्लम यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास नगरसेवक कुमार वाकळे,डॉ. प्रकाश व सुधा कांकरिया,मनोज झंवर, विक्रम डीडवाणिया, हर्षद भावे, अविनाश देऊळगावकर, अशोक गांधी, विलास बडवे, चंद्रकांत पंडित,किशोर कुलकर्णी,राधिका सुवर्णपाठकी,अनघा पछाडे, अभिजित अपस्तंभ आदी मान्यवर उपस्थित होते.

