• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

गंभीर गुन्ह्यातील त्या आरोपीला तात्काळ अटक व्हावी

ByMirror

Mar 21, 2024

रिपाई महिला आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

फरार आरोपीपासून पिडीत महिला व त्याचे कुटुंबीय असुरक्षित

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या बलात्कार, अपहरण, विनयभंग, ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. रिपाईच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार यांनी सदर मागणीचे निवेदन पिडीत महिलेसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.


बहिरू लक्ष्मण दारकुंडे या व्यक्तीवर 5 मार्च रोजी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार, अपहरण, विनयभंग, ॲट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये एक आरोपी हा अटक असून, परंतु अत्याचार करणारा दुसरा आरोपी बहिरू दारकुंडे हा अद्याप फरार आहे. या घटनेला 15 दिवस उलटून देखील आरोपी अद्याप मोकाट फिरत आहे.

पीडित महिला ही भीतीच्या वातावरणात वावरत असून, सदर आरोपी महिलेच्या घराच्या परिसरात फिरत आहे. आरोपीपासून पिडीत महिलेला व तिच्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर प्रकरणातील आरोपीला अटक न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा रिपाई महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *