प्रतिष्ठान 150 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारणार
“शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या बाबासाहेबांच्या विचारांचा जागर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तथागत प्रतिष्ठानच्या वतीने रामवाडी, कोठला परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डिजेच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना वह्या व स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. जीएसटी कमिशनर विवेक घोडके, मतीन शेख, नवनाथ गवळी, आदित्य येलमाने, स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीचे नेते प्रतीक बारसे, सुजय म्हस्के, संजय कांबळे, सुजित घंगाळे, सागर चाबुकस्वार, अविनाश कांबळे, नादीर शेख, प्रवीण ओरे, सुरेश पानपाटील, विजय शिरसाठ, स्वप्नील साठे, जमीर सय्यद, योहान चाबुकस्वार, जावेद सय्यद, नईम शेख, आरपीआय महिला घाडीच्या ज्योती पवार, सविता भालेराव, सारिका साळवे, शीतल नाटिकर, अर्चना गायकवाड, विश्रांती पठारे, तथागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत म्हस्के, तुषार गायकवाड, संपदा म्हस्के, सुयश काळे, उमेश गायकवाड, सुशीला म्हस्के, मनीषा गायकवाड , संजना गायकवाड, माधवी म्हस्के, हर्षल म्हस्के, ॲड. कार्तिक म्हस्के, साकेत गायकवाड, हर्षल पेंढारकर, आकाश काळे, शहेबाज शेख, सचिन बाबणी, सुनिल भोसले, विशाल व्यवहारे, विकी प्रभळकर, संजय साळी आदी कार्यकर्ते व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जीएसटी कमिशनर विवेक घोडके म्हणाले की, “तथागत प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यकर्ते आंबेडकरी विचाराने प्रेरित होऊन कार्य करत आहेत. समाजात आंबेडकरी चळवळ सक्रियपणे राबवली जात असून, युवक मोठ्या प्रमाणात समाजकार्यात सहभागी होत आहेत. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा बाबासाहेबांचा विचार समाजात रुजविण्याचे कार्य अशा उपक्रमांमधून घडत आहे. शिक्षणातूनच खऱ्या अर्थाने परिवर्तन शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
सुशांत म्हस्के म्हणाले की, “तथागत प्रतिष्ठान दरवर्षी वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत आहे. आगामी काळात स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टॅलेंट असूनही योग्य दिशा नसल्यामुळे ते मागे पडतात. त्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिक बारसे म्हणाले की, “वंचित आणि शोषित घटकातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. शिक्षण हेच यशाचे खरे साधन असल्याचे स्पष्ट केले. सुजय म्हस्के यांनीही आपल्या मनोगतात सांगितले की, “सर्वसामान्य घटकातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता आहे, मात्र योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे ते पुढे जाऊ शकत नाहीत. अशा उपक्रमांमधून त्यांना दिशा देण्याचे कार्य होत असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमात तथागत प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू कुटुंबातील 150 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थी शिक्षित व्हावा आणि सर्वसामान्य कुटुंबातून अधिकारी घडविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून भविष्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा मानस देखील व्यक्त करण्यात आला.
