• Fri. Aug 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

लक्ष्मीआई यात्रा उत्सवाची शहरात रंगली मिरवणूक

ByMirror

Aug 13, 2026
लक्ष्मीआई यात्रा उत्सवाची शहरात रंगली मिरवणूक

भंडाऱ्याची उधळण करीत भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढ अमावस्यानिमित्त शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवाडी परिसरातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. घोड्यांच्या बग्गीत असलेल्या लक्ष्मीमातेच्या मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधले. भंडाऱ्याची उधळण व लक्ष्मीमातेचा जयघोष करीत भाविक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.


आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक मोहित पंजाबी व सागर मुर्तंडकर यांच्या हस्ते नारळ वाढवून यात्रेच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मिरवणुकीत प्रकाश वाघमारे, सागर साठे, पप्पू पाटील, अश्‍विन खुडे, दीपक सरोदे, दीपक साबळे, सतिश साळवे, सुरेश वैरागर, कुणाल डाके, दीपक लोखंडे, किशोर उल्हारे, बंटी साबळे, पप्पू पाथरे, गणेश ससाणे, अजय केंजरला, मयूर चखाले, अमित कांबळे, राजू दिवटे आदींसह युवक व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


दरवर्षी लक्ष्मीआई यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून, 50 ते 60 वर्षची या यात्रेला परंपरा आहे. युवकांनी प्रवरा संगम येथून कावडीने आणलेल्या जलने रामवाडी येथील लक्ष्मी मातेच्या मुर्तीला अभिषेक घालण्यात आला. विधीवत पूजा करुन लक्ष्मीमातेच्या उत्सवमूर्तीची मिरवणूक शहरातून काढण्यात आली. भाविकांसह युवकांनी भक्तीगीतांवर ठेका धरला होता. पारंपारिक वाद्यांनी संपूर्ण परिसर दणाणून निघाला. ही शोभायात्रा कोठला, मंगलगेट, सर्जेपूरा, रंगभवन येथून मार्गक्रमण होऊन रामवाडी येथे तिचा समारोप झाला.


तसेच यात्रेच्या आदल्यादिवशी रामवाडीत यात्रेनिमित्त भंडाऱ्याचे प्रारंभ उपमहापौर धनंजय जाधव, जय भोसले व सुनिल उमाप यांच्या हस्ते करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी भंडाऱ्याचा लाभ घेतला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *