• Wed. Oct 15th, 2025

विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती व परंपरेच्या वैभवाचे घडविले दर्शन

ByMirror

Jan 13, 2025

केडगावच्या सरस्वती विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे संस्कृतीचे दर्शन घडवणारा असावा- आ. संग्राम जगताप

नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती व परंपरेच्या वैभवाचे दर्शन घडविले. तर विद्यार्थ्यांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा देखील यावेळी रंगली होती.


स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. विद्या प्रतिष्ठान व डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान चे अध्यक्ष दादाराम ढवण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, उद्योजक राजेंद्र शिंदे, सुमनताई कुरेल, सोमनाथ दिघे, रावसाहेब पवार, डॉ. अरुण कुलकर्णी, ज्ञानेश्‍वर अंदुरे, संभाजीराजे पवार, माजी नगरसेवक मनोज कोतकर, ॲड. प्रज्ञाताई आसणीकर, उद्योजक जालिंदर कोतकर, गणेश भोंग, रवींद्र चोभे, बाबासाहेब वायकर, राधेश्‍याम कुलकर्णी, अनिल झिरपे, शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर, मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी, सावेडी शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी काजळे, स्वाती कोळपकर, यशराज पाचारणे आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे संस्कृतीचे दर्शन घडवणारा असावा. फक्त मनोरंजन पुरते कार्यक्रम मर्यादीत न ठेवता मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती मिळणे महत्त्वाचे आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर कौशल्य आत्मासात होण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षणाबरोबरच इतर कला-कौशल्य आत्मसात करण्याचा संदेश त्यांनी दिला. तसेच शाळेस वेळोवेळी मदत करण्याचे आश्‍वासन दिले.


प्रमुख पाहुणे राजेंद्र शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभ शिवछत्रपतींच्या आरतीने करण्यात आले. गणेशवंदना व सरस्वती पूजनाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचे दुष्परिणाम, रामायण, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्त्रीजीवन, अध्यात्म या विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विविध गितांवर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला होता. शिवराज्याभिषेकाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


चिमुकल्यांच्या विविध कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थित पालक भारावले. उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता खिलारी यांनी केले. अर्चना कुलकर्णी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *