• Fri. Jul 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

वासन टोयोटाचे नवीन अत्याधुनिक ‘2S’ सुविधांनी सुसज्ज वर्कशॉपचे उद्घाटन

ByMirror

Feb 14, 2026
महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर यांच्यासह नगरसेवकांचा सन्मान

महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर यांच्यासह नगरसेवकांचा सन्मान


व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात वासन टोयोटाची पायोनियरची भूमिका -आ. संग्राम जगताप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट (एमआयडीसी) परिसरात वासन टोयोटाचे नवीन, प्रशस्त आणि अत्याधुनिक ‘2S’ सुविधांनी सुसज्ज असे हायटेक वर्कशॉपचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. तर महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर यांच्यासह नगरसेवकांचा वासन टोयोटा परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.


या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे विश्‍वस्त प्रा. माणिक विधाते, गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे चेअरमन सचिन जगताप, वासन टोयोटाचे चेअरमन विजय वासन, शोरुमचे जनक आहुजा आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात अनिश आहुजा म्हणाले की, वासन टोयोटामध्ये दिवसंदिवस वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. विक्री पश्‍चात अद्यावत सोयी-सुविधा देण्यासाठी व काळाची गरज ओळखून अद्यावत तंत्रज्ञानानेयुक्त हायटेक वर्कशॉपची निर्मिती करण्यात आली आहे. याच बरोबर वासन टोयोटाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाची त्यांनी माहिती दिली.
पाहुण्यांचे स्वागत जनक आहुजा यांनी केले. याप्रसंगी महापौर, उपमहापौर यांच्यासह नगरसेवकांचा विजय वासन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान झपाट्याने बदल असताना, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये देखील मोठा बदल होत आहे. वासन परिवार ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकरी वर्गा पर्यंत पोहचला असल्याने गाव पातळीवर त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात चारचाकी घेण्यासाठी वासन टोयोटाला पसंती मिळत आहे. या व्यवसायत एक चांगली ओळख त्यांनी निर्माण केली आहे. वाहन विक्रीनंतर ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी अत्याधुनिक ‘2S’ सुविधांनी सुसज्ज असे हायटेक वर्कशॉपची भर घालण्यात आली आहे. व्यवसायाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही चांगल्या पध्दतीने योगदान सुरु आहे. विविध आरोग्य, नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान तसेच कोरोनात सुरु केलेली लंगर सेवा आजही सुरु असल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात वासन टोयोटा पायोनियरची भूमिका बजावत असल्याचे सांगितले.


जागतिक पातळीवरचे ब्रॅण्ड व त्याच्या सेवा शहरात येत आहे. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी देखील मिळत आहेत. शहर स्वच्छ होण्यासाठी प्रत्येकाने विचार बदलण्याची गरज आहे, तर आपली जबाबदारी घेण्याची आवश्‍यकता आहे. मानसिकता बदलल्यास शहर स्वच्छ होताना दिसणार असल्याची अपेक्षाही आमदार जगताप यांनी व्यक्त केली.
महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, शहरात नव-नवीन उद्योग व्यवसाय सुरु होत असताना, त्याचा लाभ तरुणांना रोजगाराच्या रुपाने मिळणार आहे. शहराच्या विकासात व्यवासायिक व उद्योजकांचे देखील हातभार लागत आहे. विकासामुळे शहरीकरण झपाट्याने वाढताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.


धनंजय जाधव म्हणाले की, शहराची असलेली खेड्याची प्रतिमा आमदार संग्राम जगताप यांनी विकासाच्या कामातून पुसून काढली. शहरीकरण वाढल्याने अनेक जागतिक किर्तीचे ब्रॅण्ड शहरात आले. विकासाचे व्हिजन असलेले लोकप्रतिनिधी निवडून आल्याने विकास काय असते? याची जाणीव प्रत्येक नगरकरांना झाली. त्यामुळे महापालिका निवडणुकीत देखील माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महायुतीकडे एकहाती सत्ता देण्यात आली. हा नगरकरांचा विश्‍वास विकासातून पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले.


हा सोहळ्या यशस्वी होण्यासाठी वासन टोयोटाचे सीईओ तेजिंदर बेदी, व्ही.पी. सर्व्हिस श्रीकांत नायर, व्ही.पी. सेल्स अजय गुप्ता, अनिश आहूजा आदींसह सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील मान्यवर, उद्योगपती, ग्राहक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.


वासन टोयोटाचे अत्याधुनिक ‘2S’ सुविधांनी सुसज्ज
नवीन वर्कशॉपमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘2S’ सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ग्राहकांना दर्जेदार आणि जलद सेवा देण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक उपकरणे, प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि विस्तृत सेवा विभागाची उभारणी करण्यात आली आहे. वाहनांची सर्वसमावेशक तपासणी, देखभाल व दुरुस्ती तसेच डेंटिंग, पेंटिंग व अत्याधुनिक वॉश सुविधा एकाच छताखाली करण्याची सुविधा येथे उपलब्ध असणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *