• Fri. Jul 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

नेप्तीत शिवरी यमाई देवी मूर्ती स्थापनेनिमित्त रंगली मिरवणूक

ByMirror

Feb 6, 2026
महाप्रसाद व विद्युत रोषणाईने उत्सवाची सांगता

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; फुगड्या, जयघोषांनी परिसर भक्तीमय


महाप्रसाद व विद्युत रोषणाईने उत्सवाची सांगता

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती गावात शिवरी यमाई मातेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त भव्य व उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यामुळे संपूर्ण गाव भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाले होते. गावातून निघालेल्या मिरवणुकीच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी घराघरासमोर सडा-रांगोळी काढून देवीच्या आगमनाचे स्वागत केले.
शिवरी यमाई मातेची मूर्ती नगर येथे तयार करून विधीपूर्वक जेजुरी येथे कऱ्हा नदीत पवित्र स्नान घालण्यात आले. त्यानंतर जेजुरीच्या पायथ्याशी मूर्तीची विधिवत पूजा करून श्री खंडोबांचे दर्शन घेण्यात आले. पुढे मूर्ती शिवरी येथील यमाई मातेच्या मंदिरात आणून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मूर्ती नेप्ती फाटा येथे आणण्यात आली.


देवीचे भगत बाबासाहेब होले, माजी पंचायत समिती सदस्य देवा होले, सदाशिव भोळकर, नामदेव कानडे, बंडोपंत कांडेकर, संभाजी कांडेकर, भरत कांडेकर सौरभ जपकर ,पोपट कोल्हे , सोन्याबापू कानडे, विश्‍वनाथ होले तसेच सुहासिनी महिलांच्या हस्ते मूर्तीची पूजा करण्यात आली. सजवलेल्या रथात देवीची मूर्ती विराजमान करून वाजत-गाजत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.


या मिरवणुकीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. महिलांनी फुगड्या खेळत देवीच्या जयघोषात आनंद व्यक्त केला. फटाक्यांच्या आतषबाजीत गावातील मुख्य चौकात मिरवणुकीचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच दिलीपराव होळकर, प्रा. एकनाथ होले, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, पोलीस पाटील अरुण होले, भानुदास फुले, प्रा. गोपीनाथ होले, जालिंदर होले, मल्हारी होले, सोमनाथ होले, शाहूराजे होले, गोविंद होले, छबुराव जपकर, बबन कांडेकर, प्रकाश कांडेकर, बाळासाहेब बेल्हेकर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कांडेकर, गोरख इंगोले ,गोरख जपकर, सुदाम होळकर ,रंगनाथ जपकर , लहानु गवारे, रामदास गवारे, संदीप कानडे , सिद्धांत कानडे, जमीर सय्यद, आनंदा कांडेकर, तुकाराम चौरे, राजू भोळकर, गणेश भोळकर, दिनेश भोळकर यांच्यासह परिसरातील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मिरवणूक वाजत-गाजत रानमळा येथील देवीच्या मंदिरात पोहोचली. तेथे धान्य निवास अर्पण करून दुसऱ्या दिवशी पुरोहितांच्या हस्ते देवी व कलशाची विधिवत पूजा व आरती करून मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.


या निमित्ताने मंदिराची आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आल्याने परिसर भक्तीमय वातावरणाने फुलला होता. शिवरी यमाई मातेच्या कृपेने गावात सुख, शांती व समृद्धी नांदो, अशी प्रार्थना करण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *