• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात सातव्या राज्यस्तरीय मोफत माळी वधु-वर मेळाव्याचे आयोजन

ByMirror

Feb 6, 2026

नाव नोंदणी करण्याचे आवाहन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात सातव्या राज्यस्तरीय मोफत वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रविवार दि. 22 मार्च रोजी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय टिळक रोड अहिल्यानगर येथे हा वधू वर मेळावा होणार आहे.


जय युवा अकॅडमी, जनवार्ता जीवनसाथी, क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्था, समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्था, रयत प्रतिष्ठान, सावित्रीबाई फुले महिला संस्था आदींच्या सहयोगाने या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य संयोजक पोपट बनकर, ॲड. महेश शिंदे, गणेश बनकर, स्वाती डोमकावळे, दिनेश शिंदे यांनी दिली.


विवाह संस्था टिकून राहणे, शेतकरी कुटुंबातील मुलांचे विवाह जमविणे, फक्त शासकीय नोकरीतील मुलगा पाहिजे या अट्टाहास सोडून उत्तम कला कौशल्य असणारे उद्योजक, व्यावसायिक, स्वयंरोजगार करणाऱ्या युवकांनाही पसंती द्यावी याबाबत प्राचार्य सिताराम जाधव व मंगलताई भुजबळ व तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.


मागील वर्षात 40 पेक्षा जास्त विवाह सामाजिक संस्था, समुपदेशन व जनवार्ता जीवनसाथीच्या माध्यमातून जुळून आले आहे. वधुसाठी कायमस्वरूपी मोफत नोंदणी केली जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा, शिक्षण व करिअरच्या मागे धावणारे युवक युवतीसाठी लग्नाचे विषय गंभीर बनत चालले आहे. समाज बांधवांना एकत्र आणून हा प्रश्‍न सोडविला जात आहे.


प्रथम वधू-वर घटस्फोटीत विधवा, विदुर, सापात्य, विना आपत्य असे सर्वांसाठी हा मेळावा असून, इच्छुकांनी 1 मार्चपर्यंत आपला बायोडाटा, आधार कार्ड, फोटोसह तीन प्रतीत ॲड. महेश शिंदे, पावन गणपती मंदिरा शेजारी, जुन्या कोर्टाच्या मागे टांगे गल्ली येथे नाव नोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी 9004722330 व 9921810096 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सेवानिवृत्त प्राचार्य संजय पडोळे, रामेश्‍वर राऊत, संभाजीराव कोकाटे, जयश्री शिंदे, अश्‍विनी विधाते, स्वाती बनकर, नितीन डागवाले, बाळासाहेब पुंड, सचिन मेहेत्रे आदी परिश्रम घेत आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *