• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात शालेय कबड्डी, खो-खो व हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात

ByMirror

Jul 27, 2024
निमगाव वाघात शालेय कबड्डी, खो-खो व हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात

शिक्षण सप्ताहातंर्गत क्रीडा दिनानिमित्तचा उपक्रम

शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाचा -पै. नाना डोंगरे

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात शालेय कबड्डी, खो-खो व हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. जिल्ह्यात शिक्षण सप्ताह साजरा होत असताना क्रीडा दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडला. मुला-मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमातून कलागुणांचे सादरीकरण केले. स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मंदा साळवे, अमोल वाबळे, बाळासाहेब कोतकर, प्रमोद थिटे, भानुदास लंगोटे, तेजस केदारी, तृप्ती वाघमारे, मयुरी जाधव आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाचा आहे. स्पर्धेतून खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असते. तर स्वत:चे आत्मपरीक्षण देखील होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दिवसेंदिवस मैदानी खेळाचे महत्त्व कमी होत चालले आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल मध्ये न गुंतता मैदानी खेळाकडे वळण्याचे त्यांनी आवाहन केले.
उत्तम कांडेकर म्हणाले की, क्रीडा स्पर्धेतून करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत. शासकीय नोकरीसाठी खेळाडूंना जागा राखीव आहेत. बाल वयातच खेळाची गोडी निर्माण झाल्यास त्याचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कबड्डी, खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेची माहिती देऊन खेळा विषयी मार्गदर्शन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात अनुराधा सुर्यवंशी, साक्षी वाघ, श्रावणी शिंदे, भक्ती शिंदे, पायल जाधव, अपूर्वा कापसे, अभिलाषा गायकवाड, निकिता निमसे, पुनम जाधव यांनी सहभाग नोंदवला होता.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *