• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

रविवारी शहरात संजय खामकर यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन

ByMirror

Mar 27, 2024

विविध सामाजिक संघटनांचा पुढाकार

महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल होणार नागरी सन्मान

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने संजय खामकर यांना राज्यस्तरीय संत रविदास महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रविवारी (दि.31 मार्च) गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


शहरातील टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय दुपारी 4 वाजता पद्मश्री पोपट पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रतनलाल सोनाग्रा व साहित्यिक डॉ. संजय कळमकर उपस्थित राहणार आहेत. समाजभूषण संजय खामकर गौरव सोहळा समितीच्या वतीने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेण्यात आला असून, या गौरव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


या गौरव सोहळ्यासाठी पीस फाउंडेशन, पारनेर मित्र मंडळ, आधार फाउंडेशन, मानवता सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, खानदेश मित्र मंडळ, शिवगर्जना, ए.के. सामाजिक प्रतिष्ठान, साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान, शब्दगंध साहित्यिक परिषद, मानवाधिकार अभियान, सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, फिनिक्स सोशल फाउंडेशन, प्रहार संघटना, निसर्ग मित्र समिती, कृषी मित्र परिवार, गुरु रविदास क्लब, चर्मकार विकास संघ प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *