• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

शेतात राबणाऱ्या महिलांचा सन्मान

ByMirror

Mar 25, 2024

यशवंती मराठा महिला मंडळाचा उपक्रम; सत्काराच्या सुखद धक्क्याने महिला शेतकरी भारावल्या

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने शेतात राबणाऱ्या महिलांसह रोपवाटिकेत रोपांची लागडव करुन पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. शेतात दैनंदिन कबाडकष्ट करणाऱ्या महिलांना या सत्काराच्या सुखद धक्क्याने भारावल्या. या महिलांना साडी भेट देवून त्यांचा सत्कार पार पडला.


महिला दिनाचे औचित्य साधून केडगाव बायपास जवळील औटी नर्सरीत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी यशवंती मराठा महिला मंडळाच्या संस्थापिका मायाताई कोल्हे, जिल्हाध्यक्षा गीतांजली काळे, शहराध्यक्ष मीराताई बारस्कर, ज्योती गंधाडे, सारिका गाडे, लीना नेटके, अनघा राऊत, ज्योती पवार, रूपाली ताकटे, सुलक्षणा अडोळे, कविता दरंदले, मेघा झावरे, लता भापकर, मंगल शिरसाठ, अनिता मोरे, आशाताई शिंदे, मंदा औटी, विद्या साळुंखे, आशा कोहक, डॉ. इंगोले आदींसह महिला सदस्या उपस्थित होत्या.


प्रास्ताविकात मीराताई बारस्कर यांनी शेतात अधिकतर प्रमाणात महिला काम करतात. स्वतःच्या शेतात तर त्या राबतातच, शिवाय इतरांच्या शेतातही आळीपाळीने ठरवून कामाला जातात. अन्नदाता म्हणून शेतात राबणाऱ्या महिलांचा सन्मान होण्यासाठी यशवंती मराठा महिला मंडळाने पुढाकार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकरी महिला सुजाता काकडे, उज्वला काकडे, मनीषा कनसे, वंदना काकडे, सोनीताई, चंद्रकला यांचा सत्कार करण्यात आला. तर कविता दरंदले यांची यशवंती मराठा महिला मंडळाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.


गीतांजली काळे यांनी शेतकरी महिलांच्या कष्टाची बरोबरी कोणाशी होऊ शकत नाही. कुटुंब सांभाळून त्या शेताचे काम करतात. सर्वसामान्य महिलांच्या तुलनेने ते चौपटीने काम करुन योगदान देत असल्याचे सांगितले. मायाताई कोल्हे यांनी कृषीप्रधान देशात शेतात राबणाऱ्या महिलांचा सन्मान झालाच पाहिजे. शेतात काम करणारी महिला अन्नदाताची भूमिका बजावत आहे. त्यांचा झालेला सन्मान हा सर्व महिलांच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. अनघा राऊत यांनी मराठा कुणबी मुला-मुलींसाठी असलेल्या संगणक प्रशिक्षणाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका गाडे यांनी केले. आभार रुपाली ताकटे यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *