• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

विजय भालसिंग यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

ByMirror

Dec 18, 2023

सरपंच सेवा संघाच्या वतीने रविवारी होणार सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे व प्रदेशाध्यक्ष रोहित पवार यांनी भालसिंग यांना पुरस्कार जाहीर करुन त्याच्या पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.


सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य क्षेत्रात विजय भालसिंग गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहे. मुळगाव वाळकी (ता. नगर) असलेले भालसिंग एसटी बँकेत कार्यरत असून कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सेवा करत आहे.

गरजू-निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, मंदिराचे जीर्णोध्दार, सार्वजनिक परिसर व बारवची स्वच्छता, वारकरी संप्रदायाचे संघटन, वृक्ष रोपण आदी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. गाव पातळीवर विकासात्मक कार्याला चालना देऊन त्यांचे समाजकार्य सुरु आहे. त्यांच्या या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


रविवारी 24 डिसेंबर रोजी शहरातील माऊली संकुल सभागृहात आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते तर यादवराव पावसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भालसिंग यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *