• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

भिंगारमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने गुरु तेग बहादुरजी यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन

ByMirror

Nov 25, 2025
जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण व गुरुद्वारा परिसरात स्वच्छता मोहिम

जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण व गुरुद्वारा परिसरात स्वच्छता मोहिम


गुरु तेग बहादुरजी यांनी धर्मांतराच्या दडपशाहीविरोधात उभे राहत धैर्याचा अद्वितीय संदेश दिला -संजय सपकाळ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शीख धर्मातील नववे गुरु गुरु तेग बहादुरजी यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या 350 वर्षांच्या स्मृतिदिनानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विविध उपक्रमांनी त्यांना अभिवादन करण्यात आले. धर्मसंरक्षणासाठी मृत्यू पत्करलेल्या या तेजस्वी संताच्या स्मृतिप्रित्यर्थ भिंगार येथील गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. तसेच गुरुद्वाऱ्यात दर्शन घेऊन गुरुद्वारा परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.


प्रज्योतसिंग सागू व प्रशांत चोपडा यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी गुरुदयाल कौर मिनहास, उपदेशकौर राणू, प्रांजली सपकाळ, पार्वती स्वामी, ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, जहीर सय्यद, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, दिलीपराव ठोकळ, अभिजीत सपकाळ, ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, दीपक मेहतानी, रतन मेहेत्रे, मनोहर दरवडे, सुधीर कपाळे, विलासराव आहेर, अविनाश जाधव, दिलीप गुगळे, प्रकाश देवळालीकर, सरदारसिंग परदेशी, इंजि. अनिलराव सोळसे, सुभाष पेंढुरकर, अशोकराव पराते, संजय भिंगारदिवे, मुकेश मुथीयान, दीपकराव धाडगे, अविनाश पोतदार, दीपक अमृत, विशाल भामरे, अशोक दळवी, मुन्ना वागस्कर, योगेश चौधरी, निजाम पठाण, जालिंदर अळकुटे, सखाराम अळकुटे, दशरथ मुंडे, संतोष लुनिया, सुहास देवराईकर, रामनाथ गर्जे, संतोष वीर, संजय शिरसाठ, अजेश पुरी, रामदास घडसिंग, विठ्ठल राहींज आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, शीख परंपरेतील दैदिप्यमान तेज असलेले गुरु तेग बहादुरजी यांनी मानवी अधिकार, धर्मस्वातंत्र्य आणि सत्यासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले. धर्मांतराच्या दडपशाहीविरोधात उभे राहत त्यांनी समाजाला अद्वितीय धैर्याचा संदेश दिला. त्यांच्या बलिदानाला 350 वर्षे पूर्ण होत असताना आपण वृक्षारोपण, स्वच्छता आणि समाजजागृतीच्या उपक्रमांद्वारे त्यांच्या शिकवणीचे स्मरण करीत आहोत. समाजातील प्रत्येक नागरिकाने गुरूंच्या प्रेरणेने सामूहिक जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले.


सचिन चोपडा म्हणाले की, गुरु तेग बहादुरजींचे जीवन म्हणजे पराक्रम, त्याग आणि सत्याच्याशी निष्ठेचा पर्व. समाजामध्ये समानता, बंधुता आणि मानवतेची ज्योत कायम प्रज्वलित राहावी, हा त्यांचा संदेश आजही तितकाच मार्गदर्शक आहे. संतांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन पर्यावरण रक्षण, सामाजिक सौहार्द आणि स्वच्छतेबाबतची जाणीव प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा हरदिन मॉर्निंग ग्रुपचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रज्योतसिंग सागू म्हणाले की, गुरु तेग बहादुरजींच्या बलिदानाने मानवतेसाठी उभे राहण्याचे शौर्य जगासमोर ठेवले. त्यांनी कोणावर धर्म लादला जाऊ नये, प्रत्येकाला श्रद्धेचे स्वातंत्र्य असावे, यासाठी प्राणार्पण केले. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची आठवण म्हणून आम्ही वृक्षारोपण व स्वच्छता मोहिम राबविली. वृक्ष म्हणजे जीवन आणि स्वच्छता म्हणजे आरोग्य; हाच संदेश पुढे नेण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *