• Fri. Nov 15th, 2024

जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत राम शेळमकर याने पटकाविले सुवर्ण पदक

ByMirror

Oct 31, 2024

मुंबई येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी निवड

नगर (प्रतिनिधी)- जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत टीम एम स्पोर्ट्स अकॅडमी स्केटिंग क्लबचा खेळाडू राम शेळमकर याने सुवर्ण पदक पटकाविले. नुकतीच ही स्पर्धा भिंगार येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूलमध्ये पार पडली. या स्पर्धेत शहरासह जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते.


सात ते नऊ वर्ष वयोगटात राम शेळमकर याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन सुवर्ण पदक मिळवले. तो आर्मी पब्लिक स्कूल (एमआयसी ॲण्ड एस) चा विद्यार्थी आहे. या स्पर्धेतून त्याची राज्य पातळीवर निवड झाली आहे.

ही स्पर्धा लवकरच मुंबई येथे होणार आहे. तो प्रशिक्षक प्रमोद डोंगरे आणि शुभम कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *