• Sat. Jun 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

एआयच्या गाण्यांमधून जनगणनेची जनजागृती

ByMirror

Jun 6, 2026
एआयच्या गाण्यांमधून जनगणनेची जनजागृती

डॉ.अमोल बागुल यांच्या गीतांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांच्या निर्देशानुसार जनगणना 2027 च्या जनजागृती मोहिमेला नवे आणि आधुनिक स्वरूप देत प्रगणक तथा जनगणना ब्रँड अँबेसिडर कवी डॉ. अमोल बागुल यांनी मराठी भाषेत जनगणनेवरील प्रेरणादायी गीतांचे लेखन करत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि चॅट जीपीटीच्या सहाय्याने या गीतांना सुरेल संगीत, आकर्षक ताल, लय आणि आधुनिक ध्वनिमुद्रणाची जोड देऊन गाणी तयार केली आहेत.

“आले जनगणनेचे पर्व, सज्ज अहिल्यानगर सर्व”, “स्वगणना करूया चला”, “पावसातली जनगणना” यांसारख्या गीतांसह सुमारे १० गाणी तयार करण्यात आली असून जनगणनेचा संदेश घराघरांत पोहोचविण्यासाठी विशेष रिंगटोन, जिंगल्स आणि ऑडिओ संदेश देखील विकसित केले आहेत,ही गाणी विविध रेडिओ चॅनेल, एफएम केंद्रे तसेच सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या गीतांच्या किंवा आर कोड विमोचनाप्रसंगी आयुक्त श्री डांगे यांनी नमूद केले की ” संगीताच्या माध्यमातून जनगणनेचा संदेश प्रभावीपणे पोहोचत असल्याने नागरिकांमध्ये जनगणनेविषयी जागरूकता वाढत आहे.परिणामी, प्रगणकांना अचूक माहिती संकलित करण्यासाठी अधिक सहकार्य मिळत असल्याचे दिसून येत आहे.”जनगणना जनजागृतीसाठी तंत्रज्ञान, साहित्य आणि संगीत यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम राज्यात आदर्शवत ठरत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यासाठी डॉ.बागुल यांना नागेंद्र मुतकेकर (अतिरिक्‍त आयुक्‍त),मेहेर लहारे( सहाय्यक आयुक्त), शहाजान तडवी- (प्र.उपायुक्त),राकेश कोतकर( जनगणना विभाग प्रमुख) तसेच बाळासाहेब पवार (प्रभाग अधिकारी),रफिक देशमुख,मास्टर ट्रेनर प्रा.संतोष देशमुख,पर्यवेक्षिका अलका दहातोंडे, यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.या गाण्यांची लिंक 9595545555 या व्हाट्सअप क्रमांकावर मिळू शकेल.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *