• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

चिपळूण येथील महिला पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा नगरमध्ये निषेध

ByMirror

Apr 15, 2025

वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला

नगर (प्रतिनिधी)- चिपळूण येथील एका युट्यूब चॅनलच्या संपादिका स्वाती हडकर यांच्यावर रविवारी (दि.13 एप्रिल) रात्री चिपळूण येथे वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला. त्यांना जखमी अवस्थेत चिपळूण येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भ्याड हल्ल्याचा मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषद अहिल्यानगर संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.


संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी याबाबत माहिती दिली. स्वाती हडकर यांनी सातत्याने वाळू माफियांच्या विरोधात लिखाण करुन त्यांच्या विरोधात आवाज उठविला. यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. नगरमध्येही या घटनेचा डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने निषेध करीत असल्याचे शेख यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *