देवगड संस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्याकडून सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- के.एस.ई. प्रतिष्ठानतर्फे कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय 31व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक तथा प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा श्री क्षेत्र देवगड संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
श्री क्षेत्र देवगड मठाचे मठाधिपती पूज्य महंत शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज तसेच संस्थानचे उत्तराधिकारी महंत पूज्य स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी दत्तात्रय वारकड यांचा सत्कार करुन त्यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी आशीर्वाद दिले. या प्रसंगी संजय सावंत उपस्थित होते.
संत साहित्याचा अभ्यास, अध्यात्मिक विचारांचा प्रसार, प्रभावी वक्तृत्व आणि काव्यलेखनाच्या माध्यमातून दत्तात्रय वारकड यांनी मराठी साहित्य व समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील साहित्यिक प्रतिभेला व्यासपीठ मिळावे, मराठी भाषा व साहित्याची परंपरा अधिक समृद्ध व्हावी आणि संतविचार समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते कार्य करत आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

