• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

पै. नाना डोंगरे यांना पंडित जवाहरलाल नेहरू जीवन गौरव पुरस्कार प्रदान

ByMirror

Apr 1, 2026
सामाजिक कार्याची दखल

जळगाव मध्ये तुबा नाज हेल्प मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने झाला सन्मान


सामाजिक कार्याची दखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तुबा नाज हेल्प मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना जळगाव येथे पंडित जवाहरलाल नेहरू जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अल्पबचत भवन, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात नंदूरबारचे उपजिल्हाधिकारी मनोज देशमुख यांच्या हस्ते डोफ्लगरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सतीश बावीस्कर, जळगाव सोसायटीचे संचालक विजय पवार, माजी मुख्याध्यापक शब्बीर शेख, एकता संघटनचे अध्यक्ष फारुक शेख, हकीम चौधरी, फारुक पटेल, संस्थेचे अध्यक्ष डॉ. जावेद शेख आदी उपस्थित होते.


सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन डोंगरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी नगर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण भागात विविध क्षेत्रांत सातत्यपूर्ण सामाजिक कार्य उभारले आहे. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य व धार्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ग्रामीण भागात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती निर्माण केली आहे.


स्त्री जन्माचे स्वागत, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जनजागृती मोहीम, रक्तदान शिबिरे यांसारखे उपक्रम व्यापक स्वरूपात राबविले जात आहेत. युवकांसाठी व्यसनमुक्ती संदर्भातील कार्यक्रम, तसेच गावपातळीवर आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ग्रामस्थांना आरोग्यसेवा देण्याचे कार्यही संस्थेमार्फत सुरू आहे. विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, युवा संमेलनांच्या आयोजनातून समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.


साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी पै. नाना डोंगरे यांनी आठ राज्यस्तरीय काव्य संमेलने तसेच चार ग्रामीण मराठी साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित केली आहेत. त्यांच्या या बहुआयामी सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *