• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

इन्शुरन्स कंपनीला कार मालकास नुकसान भरपाई देण्याबाबतचे आदेश

ByMirror

Feb 15, 2025
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा आदेश

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा आदेश

नुकसान भरपाईपोटी 2,07,700/- रुपये 6 टक्के व्याजासह आणि त्रास व अर्जाच्या खर्चापोटी 17 हजार रुपये देण्याचे निर्देश

नगर (प्रतिनिधी)- जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एच.डी.एफ.सी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीला कार मालकास नुकसान भरपाई देण्याबाबतचे आदेश दिले आहे. रस्ता अपघातानंतर इन्शुरन्स कंपनीने अर्जदाराचा दावा विनाकारण नाकारला होता. या आदेशाने कार मालकास नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तक्रारदार शमशुद्दीन बशीर सय्यद (रा. कोरेगव्हाण, ता. श्रीगोंदा) यांच्या कारचा 26 जानेवारी 2020 मध्ये रस्ता अपघात झाला होता. त्यांनी आपल्या कारच्या नुकसान भरपाईसाठी संबंधित इन्शुरन्स कंपनीकडे कागदपत्रांसह दाव्या साठी अर्ज केला होता. मात्र, इन्शुरन्स कंपनीने अर्जदाराचा दावा विनाकारण नाकारला.


अर्जदाराचा विमा नाकारल्याने तक्रारदार यांनी न्यायमंचामध्ये ॲड. गजेंद्र पिसाळ यांच्या मार्फत ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केलेला होता. सामनेवाले यांनी नुकसान भरपाई न देण्याबाबतची कारणे कोर्टाने मान्य केली नाहीत. तसेच अर्जदार यांचा विमा विनाकारण नाकारल्याचे ॲड. पिसाळ यांनी कोर्टात सक्षमपणे बाजू मांडली व अर्जदारावर झालेला अन्याय निर्दशनास आणून दिला. न्यामंचाने संपूर्ण कागदपत्रांची बारकाईने पाहणी व अवलोकन करून तक्रारदार यांना सदर अर्जाच्या नुकसान भरपाईपोटी 2,07,700/- रुपये तसेच 10 ऑगस्ट 2020 पासून सदर रकमेवरती 6% व्याज, तसेच तक्रारदास झालेल्या मानसिक शारीरीक त्रासापोटी व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रूपये 17,000/- देण्याबाबतचे आदेश करून तक्रारदार यांना मोठा दिलासा दिलेला आहे.


सदर अर्जाच्या गुणदोशावर जिल्हा तक्रार निवारण आयोग अध्यक्षा प्रज्ञा हेन्द्रे आणि सदस्या चारू डोंगरे व संध्या कसबे यांनी संपूर्ण कागदपत्रांची पाहणी व अवलोकन करून तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात तक्रारदार यांच्या वतीने ॲड. गजेंद्र पिसाळ यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. अच्युत भिसे, ॲड. विशाल पांडुळे, आणि ॲड. निखिल चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *