• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगरात 10 मे रोजी खुल्या गटातील ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन

ByMirror

May 5, 2026
राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड; धावपटूंना सहभागी होण्याचे आवाहन

खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन; विविध क्रीडा प्रकार रंगणार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील खेळाडूंसाठी अहमदनगर जिल्हा ॲथेलेटिक्स असोसिएशनच्या वतीने खुल्या गटातील (पुरुष व महिला) मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, 10 मे रोजी सकाळी 7:30 वाजता वाडिया पार्क येथील जिल्हा क्रीडा संकुलात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ॲथेलेटिक्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.


या स्पर्धेत 16 वर्षे पूर्ण झालेल्या पुरुष व महिला खेळाडूंना सहभागी होता येणार असून, जिल्ह्यातील सर्व इच्छुक खेळाडूंना मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेत प्रथम दोन क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंची पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा 31मे ते 2जून या कालावधीत पुणे विद्यापीठ पुणे येथे आयोजित केली जाणार आहे.


विशेष म्हणजे, या स्पर्धेत मिळणारे राज्य गुणवत्ता प्रमाणपत्र हे नोकरीत 5 टक्के आरक्षणासाठी उपयुक्त ठरणार असून, राज्य व जिल्हास्तरीय सहभाग प्रमाणपत्र आर्मी भरतीसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार असून, राज्यस्तरावर झेप घेण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.


स्पर्धेसाठी ऑफलाईन प्रवेश अर्ज स्पर्धेच्या दिवशी सकाळी 7:00 वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. सहभागी खेळाडूंनी आपले मूळ आधार कार्ड सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच भाला फेक आणि हातोडा फेक स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंनी स्वतःचे साहित्य (भाला व हातोडा) सोबत आणणे आवश्‍यक आहे. अधिक माहितीसाठी दिनेश भालेराव (9226238536), राहुल काळे (8830863116) आणि संदीप हारदे (9657603732) यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगितले आहे.


स्पर्धेत होणारे क्रीडा प्रकार :
खुल्या गटातील या मैदानी स्पर्धेत विविध धावणे, उड्या आणि फेक प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर, 5000 मीटर आणि 10000 मीटर धावणे, चालणे स्पर्धा, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, हातोडाफेक, लांब उडी आणि तिहेरी उडी या प्रकारांचा समावेश आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *