• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

श्री विशाल गणपती देवस्थानच्या वतीने प्रा. माणिक विधाते यांचा सत्कार

ByMirror

Aug 18, 2024
श्री विशाल गणपती देवस्थानच्या वतीने प्रा. माणिक विधाते यांचा सत्कार

प्रा. विधाते यांची शासनाच्या समितीवर झालेली निवड देवस्थानच्या दृष्टीने अभिमानास्पद -अशोक कानडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती (ट्रस्ट) देवस्थानच्या वतीने देवस्थानचे विश्‍वस्त प्रा. माणिक विधाते यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नगर शहर विधानसभा क्षेत्र निहाय समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.


श्री विशाल गणपती मंदिरात देवस्थानचे सेक्रेटरी अशोक कानडे यांनी प्रा. विधाते यांचा सत्कार केला. यावेळी चेअरमन ॲड. अभय आगरकर, व्हाईस चेअरमन पंडीतराव खरपुडे, खजिनदार पांडुरंग नन्नवरे, सहखजिनदार रंगनाथ फुलसौदर, विश्‍वस्त ज्ञानेश्‍वर(मामा) रासकर, चंद्रकांत फुलारी, बापूसाहेब एकाडे, संजय चाफे, श्रीनितिन पुंड आदी उपस्थित होते.


अशोक कानडे म्हणाले की, प्रा. माणिक विधाते यांची शासनाच्या समितीवर झालेली निवड देवस्थानच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. देवस्थानचे विश्‍वस असलेले प्रा. विधाते सामाजिक व राजकीय क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ शहरातील सर्व माता भगिनींना मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. येणाऱ्या समस्या व अडचणी सोडविण्याचे काम देखील ते करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना प्रा. माणिक विधाते यांनी श्री विशाल गणपतीच्या आशिर्वादाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्याचे बळ मिळत असून, या समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी कार्य सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *