प्रा. विधाते यांचे राजकारणासह समाज कार्यात असलेले योगदान दिशादर्शक -मारुती पवार
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नगर शहर विधानसभा क्षेत्र निहाय समितीच्या सदस्यपदी प्रा. माणिक विधाते यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा राष्ट्रवादीचे सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष मारुती पवार यांनी सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी माथाडी कामगारचे अध्यक्ष ऋषिकेश ताठे, राष्ट्रवादी विधानसभा युवक अध्यक्ष सागर गुंजाळ, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, राहुल जाधव, अय्याज सय्यद, महेश शेळके आदी उपस्थित होते.
मारुती पवार म्हणाले की, सर्वसमावेशक कार्यामुळे प्रा. माणिक विधाते यांची झालेली निवड सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. त्यांचे राजकारणासह समाज कार्यात असलेले योगदान दिशादर्शक आहे. त्यांची कार्य करण्याची पध्दत व शिस्त यांमुळे समितीचे कार्य उत्कृष्ट राहून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना प्रा. माणिक विधाते यांनी सर्व कार्यकर्ते, स्नेही व मित्र परिवाराच्या वतीने राजकारण व समाजकारणात कार्य करण्यास बळ मिळत आहे. या समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.