• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

शिवसेनेच्या वतीने मंत्री संदिपान भुमरे यांचे शहरात स्वागत

ByMirror

Jan 28, 2024

मंत्री भुमरे यांनी नगर तालुक्याच्या विविध विकासकामासाठी दिला 1 कोटी 20 लाखाचा निधी

काही क्षणातच निधी दिल्याने कार्यकर्ते भारावले

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने रोजगार हमी व फलसंवर्धन विकास मंत्री संदिपान भुमरे यांचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे भुमरे यांचा जिल्ह्याच्या वतीने पुष्पहार टाकून सत्कार करण्यात आला.


सक्कर चौक येथे फटाक्यांच्या आतषबाजीत झालेल्या स्वागत सोहळ्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते, उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके, युवासेना शहरप्रमुख पै. महेश लोंढे, नगरसेवक भैय्या परदेशी, तालुकाप्रमुख अजित दळवी, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष सरफराज पठाण, युवा सेना तालुका प्रमुख सचिन ठोंबरे, दिगंबर गेंट्याल, परेश खराडे, अंबादास कल्हापुरे, डॉ. करण गाडे, प्रल्हाद जोशी, आनंद भागानगरे, सोमनाथ शिंदे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


शहरात आलेले मंत्री संदिपान भुमरे यांनी नगर तालुक्यासाठी विविध विकास कामांकरिता 1 कोटी 20 लाख रुपये निधी जाहीर केला. काही क्षणात मंत्री यांनी निधी जाहीर करुन कागदपत्रांवर स्वाक्षरी करताच उपस्थित कार्यकर्ते भारावले.


सचिन जाधव म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संदिपान भुमरे यांनी महत्त्वाचे काम केले. एक शिवसैनिक म्हणून काम करताना उपेक्षितांना न्याय देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. तर ग्रामीण भागातील विकास कामासाठी त्यांनी एका क्षणात निधी उपलब्ध करुन शिवसेनेची कार्यपध्दती दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.


अनिल शिंदे म्हणाले की, विकासात्मक भूमिका घेऊन शिवसेना वाटचाल करत आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन राज्यकारभार चालवला जात आहे. मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहराच्या विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मिळाला. त्यातून विविध विकासकामे मार्गी लावण्यात आली. तर भुमरे यांनी नगर तालुक्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *