• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

नगरच्या अभय चव्हाणने पटकाविले ज्युनिअर महाराष्ट्र शरीर सौष्ठव स्पर्धेत रौप्य पदक

ByMirror

Mar 19, 2024

राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अभय चव्हाण याने ज्युनिअर महाराष्ट्र श्री राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. त्याची गोवा येथे होणाऱ्या ज्युनिअर राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.


पुणे येथे राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. चव्हाण याने अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत 65 किलो वजन गटात रौप्य पदकाची कमाई केली. तो गावा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.


चव्हाण याने राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत पदक पटकाविल्याबद्दल त्यांचा अहमदनगर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल गायकवाड, सचिव मनोज गायकवाड, खजिनदार सोहेल शेख, कार्यकारी अध्यक्ष सद्दाम सय्यद, परीक्षक आयनुल सय्यद, राजू थोरात, आकाश कांबळे आदी उपस्थित होते. या यशाबद्दल चव्हाण याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *