• Tue. Sep 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

मोरया प्रतिष्ठानचा गणेशोत्सव जल्लोषात; ढोल पथकाच्या वादनाने दुमदुमला गुलमोहर रोड

ByMirror

Sep 22, 2026
पारंपरिक वाद्यपथकाचे वादन, महाआरती, सत्यनारायण पूजा आणि भंडाऱ्याला भाविकांची मोठी गर्दी

पारंपरिक वाद्यपथकाचे वादन, महाआरती, सत्यनारायण पूजा आणि भंडाऱ्याला भाविकांची मोठी गर्दी


मराठी संस्कृती आणि मराठी अस्मितेवर विसर्जन मिरवणुकीत साकारला जाणार जीवंत सांस्कृतिक देखावा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील गुलमोहर रोड परिसरात मोरया प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नुकतेच पारंपरिक ढोल पथकाच्या वादनाने बाप्पाची महाआरती करण्यात आली. ढोल पथकाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला आणि भाविकांनी मोठ्या उत्साहात गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी गणांत वाद्यपथकाचे स्थिर वादन करण्यात आले. पारंपरिक वाद्यांच्या सुरावटी आणि गणेशभक्तांच्या उत्साहामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. याचबरोबर सत्यनारायण पूजेचेही आयोजन करण्यात आले होते. पूजेनंतर भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. या भंडाऱ्याचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोरया प्रतिष्ठानच्या गणरायाच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महिला, युवक तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.


आमदार संग्राम जगताप यांनीही मोरया प्रतिष्ठानला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन मदान, जनक आहुजा, मनोज मदान, हरजितसिंह वधवा, सिमरनकौर वधवा, राजेंद्र कंत्रोड, अमिता कंत्रोड, आशिष गुप्ता, सुमिता वाही, राजू जग्गी, राकेश गुप्ता, विवेक गुप्ता, करण धूप्पड, राजा नारंग, कुमार नवले, सतीश म्हस्के, राहुल डालिमकर, अक्षय पालवे, पृथ्वीराज ढापसे, नितेश जग्गी, आदित्य शिंदे, निलेश दाणे, दिलीप पवार, हर्षल शिरसाठ, प्रदीप पंजाबी, पिंकी मक्कर, अमन वाही, प्रदीप सचदेव, प्रीती सचदेव, राजेश अरोरा, स्मिता अरोरा, अंगद मदान, रेणू मदान, आनंद मुथा, नम्रता मुथा, विक्रम बोर्डावेकर, सुनीता बोर्डावेकर, पौर्णिमा बोर्डावेकर, सिद्धार्थ उपोनी, अनिता गुप्ता, किश शाह, अजय पंजाबी, रूपा पंजाबी, इजि. रोहिदास सातपुते, स्विटी पंजाबी, डॉ. खन्ना, हरविरसिंग मक्कर, शिवम पवार, जयकुमार रंगलानी, महेश सातपुते, राजेंद्र गवळी, विपुल शाह, मन्नू कुकरेजा, राहुल बजाज, संजय धुप्पड, आशिष गुलाटी, स्नेहा गुलाटी, गीता पस्सी, संगीता पस्सी, अरमान पस्सी, संतोष चौहान, दानेश्‍वर, सीमा लोणकर, यश दुग्गड, अपर्णा मदान, अर्चना मदान, अभिलाषा मदान, अनिता शर्मा, अनिल शर्मा, मुरलीधर मेहेतानी, अनुमय गुप्ता, अश्‍विनी गुप्ता, सीमा गुप्ता, कुणाल नवले, सुरेश म्हस्के, अक्षय पालवे, कविता तुपे, यश्री दुगड, आदित्य पावसे, प्रतिभा महामीने, सोहम लोखंडे, रुद्रश शिंदे, स्वरूप शिंदे, शौर्या दाने आदींसह युवक, परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन मदान म्हणाले की, दरवर्षी मोरया प्रतिष्ठान वेगळी संकल्पना घेऊन गणेशोत्सव साजरा करत असते. यावर्षी मंडळाने ‘मराठी संस्कृती व मराठी अस्मिता’ या विषयावर विशेष भर दिला आहे. या संकल्पनेवर आधारित एक जीवंत सांस्कृतिक देखावा 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सादर करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक देखाव्यामध्ये मराठी शाळा आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचा संदेश देण्यात येणार आहे. मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि मराठी अस्मिता यांचे महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा विशेष देखावा साकारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


सावेडी येथील विसर्जन मिरवणुकीत या जीवंत सांस्कृतिक देखाव्याचे सादरीकरण करण्यात येणार असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश देण्याचा प्रयत्न मोरया प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे. गणेशोत्सवातील धार्मिक कार्यक्रम, पारंपरिक वाद्यांचे सादरीकरण, सामाजिक उपक्रम आणि आगामी विसर्जन मिरवणुकीतील सांस्कृतिक देखावा यामुळे मोरया प्रतिष्ठानचा गणेशोत्सव परिसरातील नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *