• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

आमदार अमित गोरखे यांचे मातंग समाजाच्या वतीने स्वागत

ByMirror

Aug 11, 2024
आमदार अमित गोरखे यांचे मातंग समाजाच्या वतीने स्वागत

मातंग समाजाच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मातंग समाजाचे नेतृत्व करणारे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे शहरात आले असता त्यांचा शहरातील मातंग समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले.


प्रारंभी सिध्दार्थनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व आद्यक्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. लालटाकी येथे विजय वडागळे यांनी आमदार गोरखे यांचा सत्कार केला. यावेळी शासनाचा पुरस्कार प्राप्त सुनील सकट, अजय आहुजा, नानासाहेब जगताप, उमेश साठे, भारत पवार, अशोक भोसले, नितीन कसबेकर, गुलाब गाडे, भिवसेन घोरपडे, अंकुश मोहिते, चंद्रकांत काळोखे, राम वडागळे, विठ्ठल घोरपडे, शंकर उमाप, अविनाश घोरपडे, अमोल गाडे, नाना साबळे, गणेश वाघचौरे, पोपट पाथरे, भगवान मिसाळ आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार गोरखे यांच्यासह शहर व जिल्ह्यातील मातंग समाजाच्या विविध प्रश्‍न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. गोरखे यांनी मातंग समाजातील दुर्लक्षीत प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाणार असल्याचे समाजबांधवांना आश्‍वासन दिले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *