• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

मुकुंदनगर मधील विविध विकास कामाचा शुभारंभ

ByMirror

Aug 5, 2024
मुकुंदनगर मधील विविध विकास कामाचा शुभारंभ

रस्ते काँक्रिटीकरण व ड्रेनेज लाईनच्या कामाने नागरी प्रश्‍न सुटणार

विकासाभिमुख राजकारणाने नागरी प्रश्‍न सोडविण्यावर भर -आ. संग्राम जगताप

आफताब शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आपली जबाबदारी व काम हे प्रामाणिकपणे सुरु आहे. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. शहरासह उपनगरात देखील मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावण्यात आलेली आहे. विकासाभिमुख राजकारणाने नागरी प्रश्‍न सोडविण्यावर भर दिला जात आहे. कितीही अडचणी आल्या तरी, त्यावर मात करून नागरिकांच्या हिताचे काम केले जाणार असल्याचा विश्‍वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.


मुकुंदनगर मधील प्रलंबीत विकास कामे मार्गी लाऊन विविध विकास कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक समद खान, नगरसेवक आसिफ सुलतान, सामाजिक कार्यकर्ते फारूक शेख, सी.आय.व्ही सोसायटी चेअरमन आसिफ सय्यद, अजिंक्य बोरकर, मुख्तार इनामदार, अन्वर पटेल, मेहेबूब सय्यद, वाय.एल. शेख, डॉ. रिजवान, शौकत अली, शकूर शेख, नवेद बिजापुरे, हाजी नूर शेख, शहानवाज शेख, कदीर शेख, खालीद जहागीरदार, मेहराज इनामदार, डॉ. मजहर जहागीरदार, संतोष करूळकर, सोफियान शेख, अनिस शेख, हाजी शहबाज, वसीम चिरागुद्दीन, आफताब शेख, हाजी बिलाल अहमद आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नगरसेवक समद खान म्हणाले की, मुकुंदनगरची पूर्वीची आणि सध्याची परिस्थितीमध्ये मोठा फरक पडला आहे. पावसाळ्यात नागरिकांना घराबाहेर पडणे देखील अशक्य होते. मात्र सातत्याने मुकुंदनगरमध्ये विकासात्मक कामे मार्गी लाऊन या परिसराचा कायापालट करण्यात आला आहे. या विकासकामासाठी आमदार जगताप यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला. फक्त निधी देऊन न थांबता होणारे काम दर्जेदार आहे की, नाही याकडे त्यांचे प्रत्यक्ष लक्ष राहिले आहे. नागरिकांना दिलेला शब्द पाळून प्रभागातील विकासात्मक कामे केल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.


मुकुंदनगर येथील सीआयव्ही ग्राउंड येथे मेहराज मस्जिद, सारा सिटी ते दर्गा दायरा नाल्या पर्यंत 600 एम.एम ड्रेनेज लाईन टाकणे व सी.आय.व्ही कॉलनी येथील रस्ते काँक्रिटीकरण व एन.एम गार्डन समोरील रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे उद्घाटन यावेळी पार पडले.

नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल उपस्थितांनी आमदार जगताप व नगरसेवक खान यांचे आभार मानले. तर या कामांमुळे नागरी प्रश्‍न सुटणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *