• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

लहुजी शक्ती सेनेचा 25 ऑगस्टला मुंबईत राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन

ByMirror

Aug 19, 2025
लहुजी शक्ती सेनेचा 25 ऑगस्टला मुंबईत राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन

जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधवांनी सहभागी व्हावे -सुनिल शिंदे


समाजातील प्रलंबित प्रश्‍न, भविष्यातील चळवळीची दिशा आणि संघटनात्मक पुनर्गठन विषयी होणार विचार मंथन

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यात मातंग समाजाच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणारी सामाजिक व राजकीय चळवळ असलेल्या लहुजी शक्ती सेनेचा राज्यव्यापी भव्य मातंग समाज कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे सोमवार दि. 25 ऑगस्ट रोजी मुंबई येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश सचिव सुनिल शिंदे यांनी केले आहे.


हा मेळावा सकाळी 11:30 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पार पडणार आहे. ऐतिहासिक मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे व स्वागत अध्यक्ष म्हणून नारायणराव गायकवाड उपस्थित राहणार आहेत.


या मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समाजाच्या हितासाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणारा आहे. विशेषत: आर्टी स्थापना, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे मुंबई वाटेगाव येथील स्मारक, पुणे-संगमवाडी येथील आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक तसेच अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरणासंबंधी शासन स्तरीय प्रयत्न यावर प्रकाश टाकला जाणार आहे.


समाजाचे प्रलंबित प्रश्‍न, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय प्रश्‍न, भविष्यातील चळवळीची दिशा आणि संघटनात्मक पुनर्गठन व फेरबदल याविषयी विचार मंथन होणार आहे. या मेळाव्यातून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुकांचे पार्श्‍वभूमीवर समाजाची भूमिका ठरविण्यात संबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे.


हा मेळावा मातंग समाजाचे ऐतिहासिक संघर्षाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या मेळाव्यात राज्यभरातील सर्व विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते तरुण वर्ग महिला आघाडीचे पदाधिकारी, समाजातील सर्व स्तरातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष कैलासराव खंदारे यांनी दिली आहे. या मेळाव्यासाठी नगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी ज्ञानेश्‍वर जगधने, उत्तम रोकडे, सिताराम शिरसाठ, प्रवीण वैरागर, कृष्णा शेलार, लक्ष्मण निक्षेप, लखन मिसाळ, संतोष उमाप, किरण कनगरे, अनिल जाधव, लखन साळवे, जयवंत गायकवाड, सतीश शिंदे, संजय वाल्हेकर, प्रवीण शेंडगे, नवनाथ शिंदे आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *