• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा : यशवंती महिला मंडळाचा उपक्रम

ByMirror

Aug 19, 2025
वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश


ग्रामीण रुग्णालयात महिला मंडळ व वैद्यकीय अधिकारी एकत्र

नगर (प्रतिनिधी)- शहरातील यशवंती मराठा महिला मंडळातर्फे स्वातंत्र्य दिन वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला. नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा सामूहिक संदेश देण्यात आला.


यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. काटे, डॉ. बागवान, डॉ. घोळवे, डॉ. वाघमोडे, यशवंतीच्या संस्थापिका मायाताई कोल्हे, उपाध्यक्ष कविता दरंदले, माजी शहराध्यक्ष आशाताई शिंदे, विद्या काळे, मिनाक्षी जाधव, प्रतिभा भिसे, सविता बोरुडे, सारीका खांदवे, पूजाताई, सुनिता थोरात, सौ. पाठक, कदम, कावेरी निकम, तसेच रुग्णालयातील आवारे, राठोड, चाकोलकर, राजपूत, गायकवाड, खामकर, सुरडकर, बोपिनवार, अमोल जऱ्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.


मायाताई कोल्हे म्हणाल्या की, आजचा दिवस हा फक्त झेंडा फडकावून अभिवादन करण्यापुरता न राहता प्रत्यक्ष कृतीतून देशभक्ती दाखविण्याचा असतो. आपण स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करताना भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व हिरवेगार पर्यावरण देणे ही आपली जबाबदारी आहे. महिला मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. रुग्णालयाच्या आवारात लावलेले हे वृक्ष म्हणजे उद्याच्या समाजाचे प्राणवायू केंद्र आहेत. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याची काळजी घेणे हेच खरे स्वातंत्र्य दिवस साजरा केल्याचे समाधान राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


वैद्यकीय अधीक्षक डॉ. काटे म्हणाले की, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना औषधोपचार जितके महत्त्वाचे आहेत तितकेच शुद्ध हवा व स्वच्छ वातावरण महत्त्वाचे आहे. आज महिला मंडळाने घेतलेल्या वृक्षारोपण उपक्रमामुळे रुग्णालय परिसरात हरित वातावरण निर्माण होईल. झाडे लावणे हा एकदाच होणारा उपक्रम नसून त्यांचे संगोपन करणे अधिक महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमातून समाजाला एक प्रेरणादायी संदेश मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपस्थित मान्यवरांनी झाडांना पाणी घालून वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *