• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

गुढीपाडव्यानिमित्त दहिवाळ सराफ मध्ये लाडके ग्राहक योजना

ByMirror

Mar 29, 2025

खरेदीदवर आर्थिक बचतची संधी

नगर (प्रतिनिधी)- मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडव्या निमित्त दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनात लाडके ग्राहक योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत ग्राहकांना खरेदीदवर आर्थिक बचतची संधी मिळणार आहे. तर हप्त्यांनी सोने-चांदी खरेदीची सुविधा मिळणार असून, नगरकरांना याचा लाभ घेण्याचे आवाहन नवनाथभाऊ दहिवाळ व सचिन दहिवाळ यांनी केले आहे.


दहिवाळ सराफ खरवंडीकर यांचे नवनागापूर (रेणुका स्कूल जवळ), पाईपलाईन रोड (यशोदा नगर कमानी समोर) येथे दालन आहे. यामध्ये ग्राहकांना लाडके ग्राहक योजनेचा लाभ मिळणार आहे. तर नवीन मासिक बचत योजना गुढीपाडव्या पार्श्‍वभूमीवर जाहीर करण्यात आली आहे. ग्राहकांनी आवडीच्या दागिन्याचे आजच्या बाजार भावाप्रमाणे बिल करुन पुढील 12 हप्त्यांचे पैसे भरुन एक हप्ता मोफत दिला जाणार आहे. तसेच दररोजच्या खरेदीवर हजार रुपये पर्यंत सुट दिली जाणार आहे.


बारा महिन्यांच्या हप्त्यांची फेड करुन तो दागिना ग्राहकांना बुकिंग केलेल्या भावाप्रमाणे मिळणार आहे. तसेच इतर विविध योजना कार्यान्वीत असून, विविध सण-उत्सव काळात खरेदीवर विविध ऑफर ठेवण्यात येते. दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनात सर्व प्रकारचे आकर्षक डिजाईनचे सोन्याचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, कास्टिंग ज्वेलरी, सर्व स्टोन ज्वेलरी, राशीचे खडे, हिऱ्यांचे दागिने उपलब्ध आहेत. दागिन्यांच्या घडणवळणीवर सर्वात कमी मजुरी असलेले हे दालन असून, सर्व शाखांमध्ये हॉलमार्क प्रमाणे बिगर घटीचे दागिने मिळणार असल्याचे दहिवाळ यांनी सांगितले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *