संस्कार व शिक्षणाची जडणघडण शालेय जीवनात होते असते -रामदास येवले
नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ उत्साहात पार पडले. महाराणी ताराबाई कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनीचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. विद्यार्थ्यांनीनि एकापेक्षा एक सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित प्रेक्षक व पालकांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
संचालक राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे रामदास येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव बबनराव कोतकर, संस्थेचे अध्यक्ष रमेश गवळी, उपाध्यक्ष जाफर शेख, खजिनदार प्रल्हाद साठे, रावसाहेब सातपुते, जयद्र्थ खाकाळ, डॉ. सुभाष बागले, जयश्री कोतकर, मनीषा थोरात, छाया सुंबे, ज्ञानदेव बेरड, नंदेश शिंदे, संजयकुमार निक्रड, मुख्याध्यापिका वासंती धुमाळ, सखाराम गारुडकर, रेणुका म्हस्के, भारती गुंड आदींसह शालेय शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामदास येवले म्हणाले की, शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया रचला जातो. संस्कार व शिक्षणाची जडणघडण शालेय जीवनात होत असते. गरुडाची गोष्ट सांगून त्यांनी जीवनातील अपयश पचवून पुन्हा भरारी घेण्याचे आवाहन केले. तर विद्यालयास पुन्हा एकदा उर्जित अवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. विद्यालयाच्या सर्वांगीन प्रगतीसाठी सर्व संस्थाचालक प्रयत्नशील असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शालेय शिक्षक देखील योगदान देत आहे. अनेक गुणवंत विद्यार्थिनी या शाळेतून घडल्या असून, विद्यालयाची प्रगतीपथाकडे वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबन साळवे यांनी केले. सूत्रसंचालन जालिंदर सातपुते व जयश्री कोतकर यांनी केले. आभार सखाराम गारुडकर यांनी मानले. स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.