साहित्य व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या व मुक्त पत्रकार सरोज आल्हाट यांना यशवंत सेना व जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवानिमित्त शहरात झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात आल्हाट यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी प्राचार्य तुळशिराम भोजने, यशवंत सेनेचे शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर, सरचिटणीस अजय जाडकर, मच्छिंद्र बिडगर, शर्मिला नलावडे, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त रेश्मा पुणेकर आदी उपस्थित होते.
सरोज आल्हाट या केवळ साहित्यिक, कवयित्री म्हणूनच नव्हे, तर सामाजिक प्रश्नांवर लेखन व जनजागृती करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग उल्लेखनीय असून त्यांनी महिलांविषयक, शिक्षण आणि समाजजागृती विषयांवर प्रभावी काम करत आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वीही त्यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

