• Thu. Jun 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

स्वस्तिक चौकात जेली चहा बन मस्का दालनाचा शुभारंभ

ByMirror

Jul 30, 2024
स्वस्तिक चौकात जेली चहा बन मस्का दालनाचा शुभारंभ

दर्जेदार चहाबरोबर मिळणार जेली बन मस्काचा आस्वाद

जिद्द, चिकाटी व आत्मविश्‍वासाने युवकांनी व्यवसायात पुढे जावे -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पुणे बस स्टॅण्ड येथील स्वस्तिक चौक येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या जेली चहा बन मस्का दालनाचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, सुप्रसिद्ध बालसिने अभिनेता साईराज सरडे, नगरसेवक प्रकाश भागानागरे, हरी भाऊ, रोहित कोडम, स्वप्निल घुले, प्रफुल्ल साळुंके, पवन साळुंके, कमलेश तडका, अजय तडका, महेश वाकचौरे, अभिजीत काळे, शिवतेज भागानगरे, मयूर चित्राल आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कोणताही व्यवसाय लहान अथवा मोठा नसतो. तो व्यवसाय आपण कसा करतो? यावर त्याचे मोठेपण सिध्द होत असते. एखाद्या व्यवसायात यश मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी व त्या व्यवसायाची आवड असावी लागते. सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्‍न बिकट असताना युवकांनी व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे. नागपूर येथील एका चहा वाल्याकडे चक्क मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स देखील येऊन गेले. यावरुन प्रत्येक व्यवसायाची उंची त्याचा दर्जा, कल्पकता आणि कौशल्यावर ठरत असल्याचे सांगितले. तर जिद्द, चिकाटी व आत्मविश्‍वासाने युवकांनी व्यवसायात पुढे जाण्याचे त्यांनी आवाहन केले.


संचालक रोहित कोडम यांनी चोखंदळ नगरकरांना जेली चहा बन मस्काचा आस्वाद घेता येणार असून, दर्जेदार चहाबरोबरच जेली बन मस्का नगरकरांच्या पसंतीस उतरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *