• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये डॉ. उद्धव शिंदे यांचा सन्मान

ByMirror

Dec 12, 2024
ब्रिगेडियर वाणी सूर्यम यांनी केला सत्कार

ब्रिगेडियर वाणी सूर्यम यांनी केला सत्कार

नगर (प्रतिनिधी)- भारतीय लष्कराच्या मुख्यालय दक्षिण कमांडच्या नेतृत्वाखाली आयोजित विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये सहभागी धावपटूंचे अहिल्यानगरमधील किल्ला गार्डन येथे स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात स्नेहबंध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा मिलिटरी हॉस्पिटलच्या ब्रिगेडियर वाणी सूर्यम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


पुणे येथे 15 जानेवारी 2025 रोजी आयोजित सैन्य दिवस कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर 405 किमीच्या प्रवासाचा एक भाग असलेल्या या मॅरेथॉनचे आयोजन 1971 च्या भारत-पाक युद्धातील भारतीय सैन्याच्या दैदिप्यमान विजयाचे स्मरण करण्यासाठी आहे. ही अल्ट्रा मॅरेथानमध्ये नगरमध्ये आल्यानंतर मिलिटरी हॉस्पिटलचे ब्रिगेडियर वाणी सूर्यम यांनी धावपटूंचे स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्याबद्दल स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा ब्रिगेडियर वाणी सूर्यम यांनी शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी टुरीस्ट गाईड अमोल बास्कर उपस्थित होते. डॉ. उद्धव शिंदे हे नि:स्वार्थ भावनेने समाजातील वंचित, निराधार, वृद्धांच्या आरोग्यासाठी तसेच गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम करतात. पर्यावरण संवधर्नासाठीही त्यांचा पुढाकार आहे. या कार्याची दखल घेत त्यांचा हा गौरव करण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *