• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात पर्यावरणपुरक पध्दतीने पेटवली होळी

ByMirror

Mar 18, 2025
विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ

विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ

पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीसाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज -पै. नाना डोंगरे

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय वतीने स्वच्छता अभियान राबवून, पर्यावरणपुरक पध्दतीने होळी पेटविण्यात आली. तर शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. मागील पंधरा वर्षापासून गावात हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.


नवनाथ विद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जमा झालेल्या झाडांच्या पाला-पाचोळ्याची होळी पेटविण्यात आली. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, अमोल वाबळे, तेजस केदारी, तृप्ती वाघमारे, निकिता रासकर, भानुदास लंगोटे, प्रमोद थिटे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे आदींसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, पर्यावरणाचा बिकट होत चाललेला प्रश्‍न व युवकांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. तंबाखू, विडी सिगारेटमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. त्याला तंबाखू, विडी सिगारेट प्रमुख कारण ठरत आहे. तर दारुने अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. युवकांनी व्यसनांची होळी करुन निरोगी जीवन जगावे. होळीसाठी लाकूड न जाळता वाळलेला पाला, पाचोळा जाळल्यास एक पर्यावरणपुरक होळी साजरी करता येणार असल्याचे सांगून, पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीचे आवाहन त्यांनी केले.


मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांनी गावात स्वच्छता मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगून, यामुळे गाव निर्मळ व निरोगी होणार असल्याची आशा व्यक्त केली. या मोहिमेत शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमास नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालयाचे यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *