• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

उच्च न्यायालयाच्या आदेशाने 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक, शिक्षकेतरांना जुनी पेन्शनचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा

ByMirror

Apr 2, 2025
जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन

जुनी पेन्शनसाठी स्क्रुटिनी करिता प्रस्ताव सादर करण्यासाठी पत्र काढावे

जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन

नगर (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर अनुदानावर आलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव स्क्रुटिनी करिता शासनाकडे पाठविण्याकामी जिल्ह्यातील संस्थांना अवगत करण्याची मागणी जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.


या मागणीसाठी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने माध्यमिकचे शिक्षण अधिकारी अशोक कडूस, वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के, कार्यालयीन अधीक्षक महावीर धोदाड व उपशिक्षणाधिकारी संध्या भोर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी राजेंद्र लांडे, आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, सुधीर काळे, रमजान हवालदार, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, कार्याध्यक्ष संजय ईघे, समन्वयक सुनील भोर, राज जाधव, देविदास खेडकर, सुनील दानवे, भाऊसाहेब शिंदे, नवनाथ कोटकर, बाबासाहेब गुळवे, उल्हास गुळवे, सुनील म्हसे, जाकीर सय्यद, रवींद्र औताडे, भगवान रसाळ, सुदाम दळवी, आबासाहेब गायकवाड, संतोष हराळ, आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रस्ताव स्क्रुटिनी तयार केले जाणार असून, याबाबत संस्थांना देखील पत्र काढले जाणार असल्याचे आश्‍वासन शिक्षकांच्या शिष्टमंडळास दिले.
27 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालय मुंबई यांनी जुनी पेन्शन बाबत निर्णय दिला असून, त्यामध्ये 1नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना (नियम 1982) लागू करणे करिता शिक्षणाधिकारी यांना उपसंचालक यांच्याकडे स्क्रुटिनी सादर करण्याचे आदेश झालेले आहे.


यामध्ये माध्यमिक शिक्षक, कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव निकालापासून 45 दिवसात संस्थाने विविध कागदपत्रासह शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे सादर करावे व उच्च माध्यमिकचे प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. या निकाला अगोदर लार्जर बेंचचा निकाल लागलेला आहे. तसेच शंभर टक्के अनुदान असलेल्या शाळेवरील अनेक कर्मचाऱ्यांचे निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागलेले असून देखील सदर दोन्ही प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित आहे, असे असून देखील 27 फेब्रुवारी च्या निकालात सर्व कर्मचाऱ्यांसाठी आशादायक निकाल लागलेला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


न्यायालयीन प्रक्रियेत आपला जिल्हा मागे राहू नये व स्क्रुटिनीसाठी आपला प्रस्ताव वेळेत दाखल करावा आणि पोहच घ्यावी. केवल स्क्रुटिनी न झाल्यामुळे या योजनेपासून शिक्षक, शिक्षकेतर वंचित राहू नये, लवकरच प्रस्ताव पाठवावे असे संस्थेस पत्र काढण्याची मागणी जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *