• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

घर घर लंगर सेवेच्या वतीने धनेश बोगावत यांचा गौरव

ByMirror

Oct 20, 2024
माणुसकीच्या भावनेने बोगावत यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद -जनक आहुजा

सेवा कार्यातील योगदान व नवोदित कलावंतांना प्रोत्साहन देण्याच्या कार्याचा सन्मान

माणुसकीच्या भावनेने बोगावत यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद -जनक आहुजा

नगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या घर घर लंगर सेवेच्या अन्न छत्रालयाला सातत्याने मदत करणारे व शहरातील नवोदित कलाकारांसाठी व्यासपीठ निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने योगदान देणारे धनेश बोगावत यांचा घर घर लंगर सेवेच्या वतीने सन्मान करण्यात आला.


शहरातील स्विट होम मध्ये बोगावत यांचा जनक आहुजा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, रवी बक्षी, डॉ. संजय असणानी आदींसह घर घर लंगर सेवेचे सेवादार उपस्थित होते.
जनक आहुजा म्हणाले की, घर घर लंगर सेवेच्या अन्न दानामध्ये अनेक सेवादारांचे हातभार लागले असून, आजही ही सेवा गरजूंसाठी सुरु आहे. या माणुसकीच्या भावनेने धनेश बोगावत यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
हरजितसिंह वधवा म्हणाले की, शहराच्या सांस्कृतिक चळवळीला नेहमीच बोगावत यांनी पाठबळ दिले आहे. त्यांचे वडिल छगन बोगावत हे एक उत्तम कलाकार व संगीतप्रेमी होते. त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम धनेश बोगावत करत आहे. नवोदित कलाकारांना त्यांनी दिलेले पाठबळ दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना धनेश बोगावत म्हणाले की, घर घर लंगर सेवेच्या वतीने कोरोनाच्या टाळेबंदीपासून शहरातील लाखो गरजू घटकांना दोन वेळचे अन्न देऊन त्यांची भूक भागविली. लंगर सेवेच्या अन्न छत्रालयात अवघ्या 10 रुपयात एका व्यक्तीला पोटभर जेवणाचे फुड पॅकेट दिले जात आहेत. मागील चार वर्षापासून शहरात लंगरची सेवा अवितरत सुरु आहे. या सेवा कार्यात बोगावत परिवाराने खारीचा वाटा उचलला असल्याचे त्यांनी सांगितले. तर हा सत्कार नेहमीच सेवा कार्य करण्यास बळ देणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *