• Sat. Jul 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

संविधान दिनानिमित्त वाळुंजला ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार

ByMirror

Nov 26, 2024
समाज परिवर्तन संस्था व जिल्हा क्रीडा कार्यालयाचा उपक्रम

समाज परिवर्तन संस्था व जिल्हा क्रीडा कार्यालयाचा उपक्रम

वेळेवर आजाराचे निदान झाल्यास भविष्यातील गंभीर धोके टाळता येतात -रावसाहेब काळे पाटील

नगर (प्रतिनिधी)- संविधान दिनानिमित्त वाळुंज (ता. नगर) येथील आरोग्य केंद्रात ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. मंगळवारी (दि.26 नोव्हेंबर) समाज परिवर्तन संस्था व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने युवक कल्याण कार्यक्रम अंतर्गत या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सरपंच पार्वतीबाई हिंगे, उपसरपंच अलकाबाई दरेकर, सोसायटीचे चेअरमन मंदाताई दरेकर, ग्रामपंचायत सदस्या कविता गायकवाड, यांचा मार्गदर्शन खाली व सह्याद्री छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, समाज परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर रणनवरे, सुहास सोनवणे, मोहन शिरसाठ आदींसह सोसायटी, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रावसाहेब काळे पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात आरोग्याची जागृती होणे आवश्‍यक आहे. गंभीर आजार झाल्यावर ग्रामस्थ औषधोपचारासाठी धावतात. मात्र वेळेवर आजाराचे निदान झाल्यास भविष्यातील गंभीर धोके टाळता येतात. यासाठी आरोग्य शिबिर गरजूंसाठी संजीवनी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. भास्कर रणनवरे म्हणाले की, आरोग्य सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा आहे. आरोग्य सेवेतून एखाद्याचे जीव वाचविण्याचे समाधान मिळते. गरजू घटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांना शिबिराचा आधार मिळत आहे. समाजातील दुर्लक्षीत घटकांना आरोग्यसेवा पुरविणे काळाची गरज बनली आहे. सदृढ आरोग्य असल्यास आनंदी जीवन जगता येते. नागरिकांनी आरोग्याबाबत जागृक राहून वेळोवेळी तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.


मोहन शिरसाठ म्हणाले की, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे तो आपले… तोच साधू ओळखावा देवी तेथे मानावा! या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आजारांची व पिढीत असलेल्या लोकांची सेवा करणे हाच खरा मानव धर्म आहे. मानवतेच्या भावनेने समाज परिवर्तन संस्था कार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सुहास सोनवणे यांनी शिबिर आयोजित करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना संविधानाचे वाटप करुन सन्मान केला. डॉ. अनिल ससाणे, डॉ. आशिष टाक यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले. यामध्येे किमान दोनशे विविध प्रकारच्या रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्वचारोग तज्ञ डॉ. गोरख गायकवाड यांनी त्वचारोग संबंधी तपासण्या केल्या. तर दातांच्या व जबड्यांच्या विकारावर डॉ. प्रताप घोडके व डॉ. जगताप यांनी ग्रामस्थांची तपासणी करुन उपचार केले. स्त्रीरोग तज्ञ डॉ. भास्कर रणनवरे व डॉ. योगिता सेजल यांनी महिलांची आरोग्य तपासणी केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी सिस्टर सुरेखा कोके, आवारी सिस्टर, आरती व विनोद पाटील यांनी परिश्रम घेतले. आरोग्य केंद्राचे विनोद पाटील यांनी आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *