19 विद्यार्थी पात्र
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना बहुउद्देशीय आणि सेवाभावी संस्था संचलित ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेस मधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले असून, 19 विद्यार्थी पात्र झाले असल्याची माहिती संचालक प्रा. प्रसाद जमदाडे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी क्लासेस मधील इयत्ता 5 वी 8 वी चे मिळून 21 विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी 19 विद्यार्थी पात्र झाले असून जिल्हा गुणवत्ता यादीत दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. यामध्ये इयत्ता 5 वी चा विद्यार्थी चि. ओंकार नितीन चेमटे आणि इयत्ता 8 वी चा विद्यार्थी चि. हेमंत दीपक भालेकर यांनी अनुक्रमे 5000 रुपये आणि रुपये 7500 रुपये प्रति वर्ष शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.
विद्यार्थ्यांना क्लासेस मधील सर्व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचे कौतुक करताना प्रा.जमदाडे म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवून आपल्या आईवडिलांचे, शिक्षकांचे आणि क्लासेसचे नाव उंचावले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षकवृंद, पालक आणि केडगाव मधील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

