• Fri. Jul 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

ढगे केमिस्ट्री क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे MHT-CET-2026 परीक्षेत उल्लेखनीय यश

ByMirror

Jul 10, 2026
तब्बल 90 विद्यार्थ्यांनी मिळवले 90 पेक्षा अधिक पर्सेंटाइल

तब्बल 90 विद्यार्थ्यांनी मिळवले 90 पेक्षा अधिक पर्सेंटाइल


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असलेल्या सुवर्णपदक विजेते प्रा. प्रमोद ढगे यांच्या ढगे केमिस्ट्री क्लासेसने यंदाही MHT-CET-2026 च्या परीक्षेत उल्लेखनीय यशाची परंपरा कायम राखली आहे. 8 विद्यार्थ्यांना 99 पेक्षा अधिक पर्सेंटाइल तर तब्बल 90 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये तन्मय रोकडे (99.88 पर्सेंटाइल), श्रद्धा काळे (99.81 पर्सेंटाइल), मयुरेश शिंदे (99.77 पर्सेंटाइल), ऋतुराज रोकडे (99.52 पर्सेंटाइल), ओंकार जवक (99.51 पर्सेंटाइल), खुशी गुगळे (99.25 पर्सेंटाइल), मयूर पानमंद (99.02 पर्सेंटाइल) आणि श्रेया घोलप (99.01 पर्सेंटाइल) यांनी विशेष उल्लेखनीय यश मिळवत ढगे केमिस्ट्री क्लासेसच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.


सुवर्णपदक विजेते प्रा. प्रमोद ढगे यांच्या प्रभावी आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज वैद्यकीय, अभियांत्रिकी, संशोधन तसेच विविध प्रतिष्ठित क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी ढगे केमिस्ट्री क्लासेसमध्ये शिक्षण घेत असून, माफक शुल्कात गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे.


या यशाच्या निमित्ताने डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे आणि दयान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने अहिल्यानगर मध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे चे प्राचार्य डॉ. नितीन पी. शेरजे , डॉ. डी. जी. भालके (उपप्राचार्य), डॉ. पुष्पराज वारके (अधिष्ठाता) आणि डॉ. सुशील एस. बेनके ( पी.एच.डी (केमिकल बायोलॉजी), आयसर, पुणे सदस्य, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, इंग्लंड व डॉ. डी. बी. करंजुळे यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअरच्या संधी आणि यशस्वी वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन केले.


या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत मान्यवरांनी त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका पाटील शेळके यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला प्रा. प्रभाकर गवांदे, प्रा. विवेक चौधरी, प्रा. सुरेश जावळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन करण्यासाठी व्यवस्थापक युवराज महांडुळे, सहव्यवस्थापीका मोनाली पवार, मेधा बासकर यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. प्रमोद ढगे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर मिळवलेल्या यशाचे कौतुक करुन विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *