• Sun. Jun 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

धार्मिक परीक्षा बोर्ड येथील एपिक्सच्या साडी प्रदर्शनाचे उद्घाटन

ByMirror

Mar 21, 2025
धार्मिक परीक्षा बोर्ड येथील एपिक्सच्या साडी प्रदर्शनाचे उद्घाटन

साड्यांच्या वेगवेगळ्या कलेक्शनसाठी महिला चोखंदळ -पार्वती (काकी) जगताप

नगर (प्रतिनिधी)- साडी आणि साड्यांची खरेदी हा महिलांचा आवडीचा विषय. एखाद्या समारंभात किंवा प्रवासातही महिला आपल्या साडीबरोबरच अन्य महिलांच्या साड्यांवर आवडीने चर्चा करतात. मग साड्यांचे वेगवेगळे कलेक्शनसाठी ती चोखंदळ राहून साडी निवडत असते. धार्मिक परीक्षा बोर्ड येथे भरविण्यात आलेले साड्यांचे प्रदर्शन महिलांसाठी पर्वणी ठरणार असल्याचे प्रतिपादन पार्वती (काकी) जगताप यांनी केले.


पुष्कर (राजस्थान) येथील एपिक्स साडीच्या वतीने जैन धार्मिक परीक्षा बोर्ड (आनंदधाम) समोर 8 दिवसीय साडी प्रदर्शनाचे उद्घाटन पार्वती (काकी) जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, रेणुका मल्टीस्टेटच्या संचालिका जयंती भालेराव, नम्रता दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, एपिक्स साडीचे पियुष जैन, सुरेखा जंगम, रेखा मैड, सुरेखा चेमटे, नंदा पुरोहित, श्रद्धा उपाध्ये, उषा सोनी, अलका वाघ, जयश्री पुरोहित, सुनिता काळे, रेखा तिवारी, उषा सोनटक्के, मीनल बोरा, अरुणा गोयल, सुजाता पुजारी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


अलकाताई मुंदडा यांनी महिलांच्या अंगावरील साडी भारतीय संस्कृती व सभ्यता दर्शवते. अनेक उच्च पदावर गेलेल्या महिला आजही साडी परिधान करतात, ही आपली भारतीय संस्कृतीची सभ्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पियुष जैन म्हणाले की, ग्राहकांच्या आग्रहास्तव दरवर्षी पुष्कर येथून महिलांसाठी विविध साड्यांचे प्रकार एपिक्सच्या माध्यमातून घेवून आलो आहोत. आठ दिवस हे प्रदर्शन असणार आहे. साड्यांचे प्रदर्शन आनंदधाम समोर लावण्यात आले आहे. यामध्ये डिजायनर, ट्रॅडिशनल आदी विविध साड्यांसह ब्रायडल लहेंगा आणि रेडिमेड सुट्सचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.


श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 33 व्या स्मृतिदिनानिमित्त सुरु असलेल्या विविध कार्यक्रमामुळे येणाऱ्या महिला वर्गाला साडीचे प्रदर्शन पाहता येणार आहे. दि. 21 ते 28 मार्च दरम्यान हे प्रदर्शन सुरु असून, महिलांना विविध आकर्षक साड्या व रेडिमेड सुट्स खरेदी करता येणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *