• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघा येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणीचे आयोजन

ByMirror

Mar 5, 2026
55 ते 140 किलो वजन गटांमध्ये रंगणार चुरस

निवड चाचणीद्वारे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ ठरणार


55 ते 140 किलो वजन गटांमध्ये रंगणार चुरस

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघ यांच्या मान्यतेने निमगाव वाघा (ता. नगर) येथे वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ‘महाराष्ट्र केसरी किताबाची लढत 2025-26’ या स्पर्धेसाठी जिल्हा व शहर संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी शनिवार, दि. 7 मार्च रोजी पार पडणार असून जिल्ह्यातील सर्व कुस्तीपटूंनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजक पै. नाना डोंगरे यांनी केले आहे.


पै. प्रकाश बापू जगताप प्रतिष्ठान, सासवड यांच्या वतीने दि. 12 ते 15 मार्च दरम्यान सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे मातीवरील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड करण्यासाठी ही चाचणी घेण्यात येत आहे.
ही निवड चाचणी 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90 किलो तसेच महाराष्ट्र केसरी गटासाठी 85 ते 140 किलो वजन गटात होणार आहे. प्रत्येक वजन गटातून एका खेळाडूची, तर महाराष्ट्र केसरी गटातून दोन खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेला संघ सासवड येथे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा संघटनेचे राज्य सचिव मोहन खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.


निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे वय किमान 20 वर्षे पूर्ण असणे आवश्‍यक आहे. 18 व 19 वर्षे वयोगटातील खेळाडूंना वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच पालकांची संमतीपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वयाचा पुरावा म्हणून मूळ आधार कार्ड, पासपोर्ट किंवा जन्म दाखला सोबत आणणे आवश्‍यक आहे. नियमांचे काटेकोर पालन करूनच खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.


या निवड चाचणीच्या यशस्वी आयोजनासाठी पै. बाळू भापकर, संदिप बारगुजे, सागर कापसे, संदिप डोंगरे, महेश शेळके, बाबा केदार आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *