• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

भिंगारला हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा

ByMirror

Nov 26, 2025
भिंगारला हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा

संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिमेवर फुलांचा वर्षाव; मुंबर्इतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली


संविधानाने देशात समता, बंधुता व स्वातंत्र्य या मूल्यांची पायाभरणी झाली-संजय सपकाळ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ग्रुपचे सदस्य व नागरिकांनी एकत्र येत संविधान वाचन केले आणि संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिमेवर फुलांचा वर्षाव करून लोकशाहीच्या पावन स्मृतींना अभिवादन केले. यावेळी “संविधान दिन चिरायू होवो भारतीय संविधानाचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्याचप्रमाणे मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


संविधान उद्देशिकाचे वाचन हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ व सचिन चोपडा यांनी केले. कार्यक्रमाला संजय भिंगारदिवे, दीपक अमृत, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, रमेश वराडे, दीपक धाडगे, अभिजीत सपकाळ, मनोहर दरवडे, दिलीप ठोकळ, अविनाश जाधव, सुधीर कपाळे, रतन मेहेत्रे, विलास आहेर, सरदारसिंग परदेशी, दीपक मेहतानी, अशोकराव पराते, मुकेश मुथियान, अविनाश पोतदार, शेषराव पालवे, विशाल भामरे, दिलीप गुगळे, सखाराम अळकुटे, दशरथ मुंडे, निजाम पठाण, मुन्ना वाघस्कर, किरण पुलारी, योगेश हळगावकर, रामनाथ गर्जे, सूर्यकांत कटोरे, देविदास गंडाळ, संतोष वीर, अनिल शिरसाठ, विकास निमसे, अजय खंडागळे, गोकुळ भांगे, दीपकराव बोंदर्डे, किरण कवडे, जालिंदर राशिनकर, संदीप थोरे, शेख मेजर आदी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेल्या भारतीय संविधानाने संपूर्ण जगासमोर प्रगल्भ लोकशाहीचे उदाहरण ठेवले. राजेशाहीची समाप्ती करून देशाची सूत्रे सर्वसामान्यांच्या हाती दिली. संविधान हे एका समाजापुरते नसून, सर्व भारतीयांचे समान हक्कांचे संरक्षक दस्तऐवज आहे. याच संविधानामुळे देशात समता, बंधुता व स्वातंत्र्य या मूल्यांची भक्कम पायाभरणी झाल्याचे त्यांनी सांगितले.


सचिन चोपडा म्हणाले की, भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे संविधान. जगाला प्रगत लोकशाहीची ओळख देणारे तत्त्वज्ञान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाद्वारे दिले. समाजातील प्रत्येक व्यक्तीचे अधिकार सुरक्षित ठेवणारा हा पवित्र ग्रंथ आहे. संविधान जपणे, पाळणे आणि त्याचा सन्मान करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


संजय भिंगारदिवे म्हणाले की, संविधान दिन हा केवळ उत्सव नाही, तर आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान ही देशाची आत्मा आहे. आजच्या तरुणांनी संविधानातील मूल्ये आपल्या दैनंदिन व्यवहारात जगली तर भारताला प्रगतीची नवी दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. दीपक अमृत यांनी संविधानाने आपल्याला अधिकार दिले, पण त्यासोबत कर्तव्यांची जाणीवही करून दिली. नागरिकांनी बांधिलकीने वागले तर समाज आपोआप विकसित होतो. 26/11 च्या शहीद जवानांनी आपल्यासाठी प्राण दिले, त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी आपण लोकशाही मजबूत ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *